HW News Marathi
महाराष्ट्र

छत्रपती घराण्यांचा अपमान केल्याबद्दल वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक करा

मुंबई | छत्रपती घराण्यांचा अपमान केल्याबद्दल वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक करा आणि त्यांची वकिलीची सनद रद्द करा, अशी मागणी शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी केली आहे. एका वृत्तवाहिनीवरील चर्चेत छत्रपतींच्या घराण्याबाबत सदावर्तेंनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप मेटेंनी केला आहे.

“वकील गुणरत्न सदावर्ते यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीवरील चर्चेत छत्रपती आणि त्यांच्या घराण्याबद्दल जे वक्तव्य केलं, ते अतिशय खालच्या पातळीचं आहे. मी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा धिक्कार करतो, निषेध करतो. महाराष्ट्र सरकारकडे माझी स्पष्ट मागणी आहे. हा माणूस आधीपासूनच समाजात द्वेष पसरवण्याचं काम करत आहे. जातीयवाद पसरवत आहे. सदावर्ते यांच्यावर महाराष्ट्र सरकारने स्वतःहून गुन्हे दाखल केले पाहिजेत. त्यांना अटक केली पाहिजे. जातीयवाद आणि सांप्रदायिक दंगली भडकवण्याचा त्यांचा जो उद्देश आहे, तो रोखला पाहिजे” अशी मागणी विनायक मेटेंनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

खासदार गिरीश बापट यांच्या निधनाने सर्वसमावेशक, दिलदार नेतृत्व गमावले! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Aprna

येत्या दोन वर्षात प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात यावीत!– उपमुख्यमंत्री

Aprna

आर्यन खान ‘रिलिज’! आर्थर रोड जेलमधून २७ दिवसानंतर सुटका

News Desk