HW News Marathi
महाराष्ट्र

शिवस्मारक समन्वय समितीच्या अध्यक्षपदाचा विनायक मेटेंनी दिला राजीनामा

मुंबई | शिवसंग्रामचे अध्यक्ष आणि आमदार विनायक मेटेंनी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक प्रकल्प अंमलबजावणी, देखरेख आणि समन्वय समितीचा राजीनामा दिला आहे. मेटे हे २०१५ पासून समितीच्या अध्यक्ष पदावर कार्यरत होते. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विनायक मेटेंची छत्रपती शिवाजी महाराज स्मारक प्रकल्प अंमलबजावणी, देखरेख आणि समन्वय समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली होती. मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्र लिहून राजीनामा देत असल्याचे कळवले आहे.

मुख्यमंत्री ठाकरे यांच्या नेतृत्त्वात अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच स्मारक पूर्ण व्हावे, अशी इच्छाही व्यक्त केली आहे. मेटेंनी पत्र लिहले आहे. ‘आपल्या नेतृत्वाखाली महाराजांचे स्मारक लवकरात लवकर पूर्ण होवो ही सदिच्छा व्यक्त करत असतानाच या कार्यक्रमासाठी माझी काही आवश्यकता भविष्यामध्ये लागल्यास माझे सहकार्य हे सदैव राहील,’ असे विनायक मेटे यांनी पत्रात नमूद केले आहे.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक अरबी समुद्रात उभारले जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा उभारण्याचा मानस महाराष्ट्र सरकारचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा उभा पुतळा करायचा ठरल्यास, त्याची उंची १५३ मीटर करण्याचा विचार आहे. सरदार पटेलांच्या १५२ मीटरच्या पुतळ्यापेक्षा एक मीटरने उंच पुतळा शिवरायांचा करण्याचा विचार असून, सध्या प्रस्तावानुसार शिवस्मारकाचा पुतळ्याची उंची १२३.२ मीटर, तर चबुतरा ८८.८ मीटर आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अ‍ॅमेझॉनला धडा शिकवल्यानंतर आता मनसेने आपला मोर्चा डॉमिनोजकडे वळवला!

News Desk

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वाची बैठक

News Desk

गणेशोत्सवाला जाताना चाकरमान्यांना पाळावे लागणार काही नियम, जाणून घ्या कोणते?

News Desk