HW News Marathi
महाराष्ट्र

अमित शहांनी संपूर्ण भाषणात शिवसेना आणि उद्धव ठाकरे टार्गेट केले हेच आमचे यश – विनायक राऊत

सिंधुदुर्ग | खासदार नारायणे राणे यांनी आपल्या मेडिकल कॉलेजच्या उदघाटनाला शिवसेनेवर तोंडसुख घेण्यासाठीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह याना बोलावले होते अशी जोरदार टीका शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केली संपुर्ण भाषणात शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याच्या शिवाय दुसरा विषय सापडला नाही यातच शिवसेनेचे मोठे यश असल्याचे ते म्हणाले आहेत मातोश्री वर झालेली चर्चा बंद खोलीत झालेली नाही दैवताच मंदिर मानतो याचे साक्षीदार भाजपाचे वरीष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी आजही आहेत असेही ते म्हणाले आहेत.

नारायण राणे यांच्या पडवे येथील मेडिकल कॉलेजच्या उद्घाटनासाठी आलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात शिवसेनेवर टीका केली होती त्याला खासदार विनायक राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. तळगाव येथील निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलताना म्हणाले की केंद्रीय गृहमंत्री जिल्ह्यात आले म्हटल्यावर सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठो किंवा महाराष्ट्रसाठो काहीतरी देतील अशी आशा येथील जनतेला होती केंद्र सरकार कडून जीएसटीची २७ हजार कोटींची रक्कम महाराष्ट्राला येणे बाकी आहे ,आपत्ती निवारणासाठी हजारो कोटींची मागणी केंद्र सरकारकडे प्रलंबित आहे. त्यावर काही भाष्य न करता अमित शाह यांनी फक्त शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करून तोंडसुख घेतले केंद्रीय गृहमंत्रीना शिवसेनेवर तोंडसुख घेण्याची वेळ आली हेच उद्धव ठाकरे यांचे यश आहे.

विधानसभा निवडणुकी नंतर सेना-भाजप युती तुटली असली तरी त्याच दुःख नाही कारण कारण निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्रीपद देण्याचं शब्द पाळलेला नाही खर तर वापरायचं आणि फेकून द्यायची ही भाजपाची ख्याती आहे अटलबिहारी वाजपेयी आणि प्रमोद महाजन असताना त्यांनी ३६ पक्ष एकत्रित करत एनडीएची स्थापना केली परंतु आजची जर परिस्थिती बघितली तर एनडीए विस्कटलेली आहे फक्त भाजपा पुरत एनडीए राहिले आहे सर्व पक्ष सोडून गेले अकाली दलने मंत्रीपदावर पाणी सोडत एनडीए सोडली लालकृष्ण आडवाणी सारख्या जेष्ठ नेत्याला अडगळीत टाकलं ,राजनाथसिंह यांनाही किंमत दिली जात नाही त्यामुळे फक्त अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोघांचाच भाजप पक्ष राहिला आहे.

बंद खोलीत आम्ही वचन देत नाही असे अमित शाह म्हणाले परंतु ती बंद खोली त्यांच्या साठो असेल पण मातोश्री हे आमच्यासाठो दैवताच मंदिर आहे यापूर्वी या मातोश्री ज्या ज्या चर्चा झाल्या त्याचे साक्षीदार अटलबिहारी वाजपेयी, प्रमोद महाजन ,लालकृष्ण आडवाणी आहेत त्यातील लालकृष्ण आडवाणी आजही साक्षीदार आहेत गोध्रा हत्याकांड प्रकरणात शिवेसनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या पाठीशी राहिले म्हणून ते आज दिसत आहेत असे खासदार राऊत म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘शिवसेनेनं आपली औरंगजेबी वृत्ती दाखवली’, सेना भवनासमोरील राड्यावरुन शेलारांचा घणाघात

News Desk

छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्या राज्यपाल कोश्यारींनी जाहीर माफी मागावी! – नाना पटोले

Aprna

प्रकाश आंबेडकर ३ महिन्यांच्या सुट्टीवर!

News Desk