HW News Marathi
महाराष्ट्र

भाजपच्या दुसऱ्या यादीत ‘या’ दिग्गज नेत्यांची नावे नाही

मुंबई। भाजप विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी काल ( ३ऑक्टोबर) जाहीर केली आहे. या यादीमध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे, राज्याचे माजी गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता आणि उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे या चार दिग्गज नेत्यांची नावे यादीत नाहीत. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा रंगल्या आहे. दरम्यान भाजपने केजमधून नमिता मुंदडा यांना उमेदवारी दिली आहे तर गोपीचंद पडळकर बारामतीतून उमेवारी देण्यात आली आहेत.

दरम्यान दुसऱ्या यादीत एकूण १४ उमेदवारांचा समावेश आहे. भाजपने पहिल्या यादीत १२५ जणांना उमेदवारी जाहीर केली होती. दोन्ही याद्या मिळून भाजपकडून आतापर्यंत १३९ उमेदवार घोषित करण्यात आली आहे. महायुतीच्या जागावाटपाच्या फॉर्म्युलानुसार भारतीय जनता पक्ष राज्यात १४६ जागा लढवणार आहे. तर आता केवळ ७ जागा जाहीर करणे बाकी आहे. त्यामुळे तिसऱ्या यादीत तरी खडसे, तावडे, बावनकुळे यांची नावे असणार का? असा सवाल उपस्थित झाला आहे.

भाजपच्या दुसऱ्या यादीतील उमेदवार

1. मोहन सुर्यवंशी – साक्री

2. प्रतापदादा अडसाद – धामणगाव रेल्वे

3. रमेश मावस्कर – मेळघाट

4. गोपाळदास अग्रवाल – गोंदिया

5. अमरिश अत्राम – अहेरी

6. निलय नाईक – पुसद

7. नामदेव ससाणे – उमरेड

8. दिलीप बोरसे – बागलन

9. कुमार उत्तमचंद ऐलानी – उल्हासनगर

10. गोपीचंद पडळकर – बारामती

11. संजय भेगडे – मावळ

12. नमिता मुंदडा – केज

13. शैलेश लाहोटी – लातूर (शहर)

14. अनिल कांबळे – उदगीर

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सिनेसृष्टीतील आणखी एका अभिनेत्याने केली आत्महत्या !

News Desk

“नाम” संस्थेमार्फत आत्महत्या ग्रस्त शेतकरी परिवाराला आर्थिक मदत

News Desk

उद्धव ठाकरेंच्या ‘या’ मागणीला आनंद महिंद्रांनी दर्शवला पाठिंबा

News Desk