HW News Marathi
महाराष्ट्र

विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यांनी घेतली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट  

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मार्च महिन्यातअयोध्येचा दौरा आयोजित केला असून, या दौऱ्याआधी विश्व हिंदू परिषदेच्या काही नेत्यांनी आज राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत सध्या अयोध्या राम मंदिर निर्माणसाठी सुरु असलेल्या निधी संकलनाच्या कार्यक्रमाबाबत विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यांनी राज ठाकरे यांना माहिती दिल्याचे मनसेकडून सांगण्यात आले आहे.

मनसेचे आमदार राजू पाटील फेसबुकद्वारे म्हणाले की, विश्व हिंदू परिषदच्या प्रमुख पधादिकाऱ्यांनी आज राज ठाकरेंची कृष्णकुंजवर भेट घेतली. सध्या अयोध्या राम मंदिर निर्माणसाठी निधी संकलनाचा कार्यक्रम सुरू आहे. राज ठाकरेंना पधादिकाऱ्यांनी कार्यक्रमाची माहिती दिली. राज ठाकरे यांनी या कार्यक्रमासाठी मदत स्वतः अयोध्येला जाऊन करणार असल्याचे सांगितले आहे. त्यांना त्यांच्या अयोध्या भेटीसाठी आमच्याकडून कुठलीही मदत लागल्यास ती आम्ही करू. त्यांच्या स्वागताच्या दृष्टीने जे काही नियोजन आणि तयारी करायची आहे, त्यासाठी आम्ही पूर्ण सहकार्य करणार आहोत, असंही विश्व हिंदू परिषदेचे नेते सालेकर यांनी सांगितले.

मनसेच्या बैठकीनंतर राज ठाकरे अयोध्या दौरा करणार असल्याची माहिती मनसेचे नेते बाळा नांदगांवकर यांनी दिली. येत्या १ ते ९ मार्च दरम्यान राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याचं नियोजन पक्षाकडून केलं जात असल्याचं समजतंदरम्यान, राममंदिराच्या निधी संकलनाचा कार्यक्रम सध्या विश्व हिंदू परिषद आणि भाजपसारख्या संघटना राज्यात राबवत असून वेगवेगळ्या संस्था ट्रस्ट यांच्या माध्यमातून दानशूर लोकदेखील मंदिराच्या उभारणीसाठी लाखो रुपयांचा निधी देत आहेत. या मंदिराच्या उभारणीच्या मुद्द्यावर विश्व हिंदू परिषदमधील काही नेत्यांनी आज राज ठाकरेंची भेट घेतली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबई डबेवाल्यांच्या मदतीला रोहित पवार पुढे सरसावले

News Desk

अमेरिकेहून मुलगी परतल्याची माहिती लपवली, तरीही लहान बाळांवर केले डॉक्टरांनी उपचार

swarit

उच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांची न्यायालयीन कोठडी रद्द करून १२ नोव्हेंबर पर्यंत ईडी कोठडी सुनावली

News Desk