HW News Marathi
महाराष्ट्र

‘नेता असो वा अभिनेता, घेणं-देणं नाही’ नांगरे पाटलांनी ठणकावलं

मुंबई | राज्यात आज(१० सप्टेंबर) गणेशोत्सव साजरा केला जात आहे. यातच मुंबईत ९ दिवस संचारबंदी लागू केली गेली आहे. नेता असो वा अभिनेता, घेणं-देणं नाही, गर्दी होऊ देणार नाही, अशा शब्दात मुंबई पेलिस कायदा सुव्यस्था सहआयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी लालबागमध्ये जाऊन ठणकावलं. नांगरे पाटील यांनी लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाशी चर्चा केली. पोलिसांनी आधी लालबाग परिसरातील दुकानं बंद केली होती. त्यामुळे स्थानिकांनी विरोध केला होता. मग पोलिसांनी स्थानिकांशी चर्चा करुन मध्यस्थीचा मार्ग काढला. त्यानंतर दुकानं सुरु करण्यात आली आहे.

दहा लोकांना आरतीसाठी परवानगी असेल

“दुकानात गर्दी होऊ शकते, त्यामुळे कोरोना संसर्गाला चालना मिळेल, त्यामुळे दुकानं बंद करण्यास सांगितलं होतं. पण आता केवळ दुकानाचा मालक आणि एक कामगार अशांना परवानगी दिली आहे. लालबागचा राजा परिसरात गर्दी होणार नाही याची काळजी मंडळाचे स्वयंसेवक आणि पोलीस प्रशासन घेईल. दहा लोकांना आरतीसाठी परवानगी असेल, दहा जणांमध्ये कोण सेलिब्रिटी किंवा कोणी नेता असो त्याच्याशी पोलिसांचं देणं घेणं नाही, पण गर्दी होणार नाही याची खबरदारी घेऊ” असं विश्वास नांगरे पाटील म्हणाले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष दर्शन, मुखदर्शन यांसाठी निर्बंध घातले आहेत. एका बाजूचे 46 आणि दुसरीकडील 47 दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला होता.

आरतीसाठी 10 लोकच असतील. मध्यममार्गानं प्रश्न सोडवला. दुकानांमध्ये 1+1 अशा दोन माणसांना परवानगी मिळेल. 144 च्या ऑर्डरमध्ये मॉडीफिकेशन केले आहे. आरतीसाठी 10 लोकांना परवानगी असेल, यात कोणी सेलिब्रिटी असतील, व्हीआयपी असतील की आणखी कोणी याबाबत पोलिसांना काही देणंघणं नाही, असं विश्वास नांगरे पाटील म्हणाले.

लालबागच्या बाप्पाचं मुखदर्शन/प्रत्यक्ष दर्शन नसेल. केवळ ऑनलाईनच दर्शन घेता येईल. अशा सर्व चर्चेनंतर लालबागच्या राजाची प्राणप्रतिष्ठापना थोड्याच वेळात होईल.

राज्य सरकारचा नेमका निर्णय काय?

राज्य सरकारने गणेशोत्सवासाठी नवी नियमावली जारी केली आहे. नव्या नियमावलीनुसार भाविकांना मंडपात जाऊन बाप्पाचे दर्शन घेता येणार नाही. तर गणेश मंडळांनी बाप्पाच्या दर्शनाची ऑनालईन तसेच इलेक्ट्रॉनिक माध्यमातून सोय करुन द्यावी, असे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत.

राज्य सरकारने गणेशोत्सवासाठी नवी नियमावली जारी केली आहे. नव्या नियमावलीनुसार भाविकांना मंडपात जाऊन बाप्पाचे दर्शन घेता येणार नाही. तर गणेश मंडळांनी बाप्पाच्या दर्शनाची ऑनालईन तसेच इलेक्ट्रॉनिक माध्यमातून सोय करुन द्यावी, असे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजप आमदाराच्या 500 कोटी प्रकरणाची चौकशी का नाही? भावना गवळींचा थेट सवाल!

News Desk

ज्येष्ठ समाजसेवक, निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर

Aprna

बीडमधील ८ लोकप्रतिनिधींना होम क्वारंटाइनच्या दिल्या सूचना

News Desk