HW News Marathi
महाराष्ट्र

काम नसताना बाहेर फिरणाऱ्या गाड्या जप्त विश्वास नांगरे-पाटील यांचे आदेश

नाशिक | जगाला वेठीस धरुन ठेवणाऱ्या कोरोना व्हायरसने संपूर्ण जगातील देश हे लॉकडाऊन झाले आहेत. भारतातही २१ दिवसांचा लॉकडाऊन सुरु आहे तसेच, राज्याच्या आणि जिल्ह्यांच्या सीमाही बंद करण्यात आल्या आहेत. मात्र, तरीही अनेक ठिकाणी नागरिक नियमांचे उल्लंघन करताना दिसत आहेत. नाशिकमध्येही विनाकारण लोक रस्त्यावर फिरतानादिसत आहेत. यांच्यावर कडक कारवाई करण्यासाठी आता नाशिकचे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील सज्ज झाले आहेत. महत्त्वाचे काम नसतानाही बाहेर फिरणाऱ्या तसेच जमावबंदी आणि संचारबंदीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांच्या गाड्या ३ महिने जप्त करण्याचे आदेश विश्वास नांगरे-पाटीलांनी दिले आहेत.

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी राज्य, केंद्र सरकार आणि आरोग्य विभागाने नागरिकांना ‘सोशल डिस्टंन्सिंग’ ठेवण्यास सांगितले आहे. दरम्यान, काही ठिकाणी बाजारपेठेत चौकोन आखून दिले आहेत. त्याच चौकोनात उभे राहून भाजीपाल्यांची किंवा इतर गोष्टींची खरेदी करण्यास सांगितले आहेत. मात्र, काही ठिकाणी नागरिक याकडे दुर्लक्ष करुन सर्रासपणे बाहेर फिरताना दिसत आहेत. तसेच, सोशल डिस्टन्सिंगही राखत नसल्याच्या घटनाही समोर येत आहेत. त्यामूळेच, अशा लोकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विश्वास नांगरे पाटील यांनी थेट गाडी जप्तीचा उपाय शोधला आहे.

नाशिक प्रशासनकडून नागरिकांची लॉकडाऊनच्या काळात गैरसोय होऊ नये म्हणून काही उपाययोजनाही करण्यात येत आहे. नागरिकांच्या जेवणाची गैरसोय टाळण्यासाठी शहरातील १०० हॉटेल्सची केवळ पार्सल सेवा सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे कुटुंबासोबत नसलेल्या नागरिकांना संबंधित हॉटेल्सला ऑर्डर करुन आपलं जेवण मागवता येणार आहे. तसेच, मुख्यमंत्र्यांनीही २४ तास अत्यावश्यक सेवा सुविधा सुरु राहणार असल्याची माहितीही देण्यात आली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“आमच्यामध्ये थोडीशी नव्हे… तसूभरही चर्चा नाही”, खातेवाटप प्रश्नावर अजित पवारांचा टोला

News Desk

२६/११ च्या हल्ल्यातील शहिदांना मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून अभिवादन

News Desk

भावना गवळींना वर्षावर नो एंट्री, मुख्यमंत्र्यांची अर्धा तास वाट बघून भेटीशिवायच परतल्या!

News Desk