HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांना पांडुरंगाची पूजा करुन देणार नाही | मराठा आंदोलक

सोलापूर | आषाढी एकादशी निमित्त वारीला महाराष्ट्रातल्या कोणाकोप-यातून वारकरी मोठ्या भक्तीभावाना पंढरपूरला हरीनामाचा गजर जयघोष आणि टाळमृदुंगाच्या गजरात दरवर्षी विठ्ठल रखुमाईच्या दर्शनाला येतात. परंतु यंदा मराठा आंदोलनाविषयी सरकारने योग्य निर्णय न घेतल्यामुळे गेल्या चार दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी ठिय्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचे दिसत आहे.

सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा आणि बार्शी तालुक्यात मराठा समाजातील आंदोलकांनी काही एसटी बसची तोडफोड करण्यात आली आहे. तसेच पंढरपुरात सहकारमंत्री सुभाष देशमुख आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना आंदोलकांनी घेराव घातला. राज्य सरकारच्या धोरणांचा निषेध नोंदवत मुख्यमंत्र्यांना पांडुरंगाची पूजा करुन देणार नाही असा इशारा यावेळी मराठा आंदोलकांनी दिला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर घाटकोपरमध्ये मनसेकडून स्पीकरवर हनुमान चालीसा वाजवण्यास सुरुवात

Aprna

हिंगणघाट जळीत कांड : पीडितेच्या मृत्यूनंतर राज्यभरात तणावाचे वातावरण

swarit

डोमकावळ्यांची पिसं झडून जातील, चोची तुटून जातील!; राऊतांचा विरोधकांवर निशाणा

News Desk