HW News Marathi
महाराष्ट्र

४० वर्षे भाजपची सेवा केली हे चुकलं का? भाजप नगरसेवकाने लावले नाराजीचे होर्डिंग्ज!

पिंपरी | पुण्यातील एक होर्डिंग सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या होर्डिंगमध्ये भाजप नगरसेवकाने आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली आहे. ४० वर्षांपासून आमचं कुटुंब भाजपाची सेवा करतंय…हे आमचं चुकलं का? सोयीचे राजकारण नाही तर स्वाभिमानी राजकारण अंगीकृत केलं हे आमचं चुकलं का? अशी विचारणा नगरसेवकाच्या वतीने करण्यात आली आहे. सत्ताधारी भाजपाचे नगरसेवक रवी लांडगे यांच्या वतीने हा होर्डिंग लावला असून तीव्र व्यक्त करण्यात आली आहे.

नुकतीच महानगरपालिकेची स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. यात त्यांचं नाव अग्रेसर होतं, मात्र त्यांच नाव डावलून इतरांना अध्यक्षपद देण्यात आल्याने ते दुखावले गेले होते. यामुळेच त्यांच्या समर्थकांनी शहरभर अशा आशयाचे फलक लावून भाजपशी निष्ठावान राहूनदेखील डावलल जात असल्याने उघड नाराजी व्यक्त केल्याचं चित्र आहे. याचे पडसाद येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीवर होण्याची शक्यता नाकारता येत नसून फलकाची स्थानिक राजकारणात जोरदार चर्चा सुरू आहे.

या होर्डींगवर लोकनेते भाजपचे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे, स्व. अंकुशराव लांडगे आणि वडिलांचे फोटो आहेत. वुई सपोर्ट रवी लांडगे असा मजकूर या फ्लेक्सवर आहे. याद्वारे त्यांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाची दादच पक्षाच्या वरिष्ठांकडे मागितल्याची चर्चा भोसरीतच नाही, तर संपूर्ण शहरात रंगली आहे. दरम्यान, त्यांचा राजीनामा महापौरांनी स्वीकारलेला नाही. तसेच ते आतापर्यंतच्या दोन्ही स्थायीच्या समितीला गैरहजर राहिलेले आहेत.

४० वर्षापासून आमचे कुटुंब भाजपची सेवा करतंय, हे आमच्या कुटंबाचे चुकले का? गोरगरिबांसाठी बांधलेल्या रुग्णालयाच्या खासगीकरणाला मी विरोध केला, हे माझे चुकले का? माझ्या वडिलांनी शहरात जनता पक्षाचा पाया रोवला, माझ्या चुलत्यांनी पक्षाचा विस्तार केला आणि मी ही एकनिष्ठ राहिलो, हे आमच्या कुटुंबांच चुकले का? सोईचे नाही, तर स्वाभिमानी राजकारण अंगीकृत केले. हे माझे चुकले का? अशी प्रश्नांची तोफ पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी डावललेले भोसरीतून बिनविरोध निवडून आलेले भाजपचे एकनिष्ठ नगरसेवक रवी लांडगे यांनी केली आहे.

शहराचे कारभारी आणि भाजपचे आमदार असलेल्या संपूर्ण भोसरी मतदारसंघात त्यांनी असे भलेमोठे चाळीसेक होर्डिंग लावल्याने शहरभर तो चर्चेचा विषय ठरला आहे. नुकत्याच झालेल्या स्थायी अध्यक्ष निवडीत ऐनवेळी डावलण्यात आल्याने त्यांनी तडकाफडकी स्थायी सदस्यत्वाचा सुद्धा राजीनामा दिला. त्याच दिवशी पत्रकारपरिषद घेऊन त्यांनी जुन्या एकनिष्ठ भाजप कार्यकर्त्यांचे खच्चीकरण सुरु असल्याचा आरोप केला होता.

गेल्या ४ वर्षात एकही पद न मिळाल्याने स्थायीचे अध्यक्षपद देऊ, असा शब्द त्यांना देण्यात आला होता. ज्यांच्या कारकिर्दीत भोसरी हा भाजपचा बालेकिल्ला झाला ते भाजपचे दिवगंत शहराध्यक्ष अंकुश लांडगे यांचे ते पुतणे आहेत. त्यांचे हे चुलते आणि वडिल बाबासाहेब यांनी शहरात भाजप रुजविलीच नाही, तर प्रतिकूल परिस्थितीत वाढवलीही आहे. त्यामुळे स्थायीसाठी डावलले गेल्यानंतर त्यांनी पक्षश्रेष्ठी आणि शहर कारभाऱ्यांना विचारणा करणारे हे फलक लावून पुन्हा खळबळ उडवून दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेना खासदाराला पडला उद्धव ठाकरेंचाच विसर, म्हणाले, ‘मुख्यमंत्री माननीय अशोक चव्हाण साहेब!’

News Desk

‘केवढ्याला पडलं तुम्हाला? फुग्याला भोक तुमच्या पडलं!’ भाजपचं सामन्यावर प्रत्युत्तर

News Desk

TET Exam : पेपरफुटी प्रकरणी महाराष्ट्र राज्य परिक्षा विभागाचे अध्यक्ष तुकाराम सुपे यांना अटक

News Desk