HW News Marathi
महाराष्ट्र

जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी लोकलने सीएसएमटी ते उल्हासनगर केला प्रवास!

मुंबई। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे आपल्या वेगवेगळ्या कार्यामुळे आणि कृतीमुळे चर्चेत येत असतात. आणि आता देखील तसंच काहीसं झाल आहे. पक्षाच्या कामासाठी प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी चक्क सीएसएमटी ते उल्हासनगर असा लोकलने आज सायंकाळी प्रवास करुन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.

मुंबईमध्ये कमी वेळेत लांबचे अंतर कापायचे असेल किंवा वेळेत कुठे पोहोचायचे असेल तर मुंबई लोकल हा सर्वात उत्तम पर्याय ! हाच पर्याय जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी निवडला आणि लोकलमध्येही शासकीय कामाचा निपटारा करताना दिसले.

आज पक्षाच्या कामकाजाकरीता उल्हासनगरला जात असताना जयंत पाटील यांनी बर्‍याच दिवसांनी आपल्या सहकाऱ्यांसह लोकलने प्रवास केला. विद्यार्थी दशेत असताना जयंत पाटील यांनी लोकलने प्रवास केला आहे. तसेच मधल्याकाळातही अनेकवेळा त्यांनी लोकलने प्रवास केला आहे. मात्र आजच्या प्रवासातील सहकाऱ्यांसोबत चर्चेदरम्यान सर्व जुन्या आठवणींना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी यावेळी उजाळा दिला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबई सायबर विभागाचा ई-मेल आयडी हॅक!

News Desk

१९ वर्षीय तरुणीवर नालासोपारामध्ये सामूहिक बलात्कार, एक जण पोलिसांच्या ताब्यात

Aprna

“मी तुम्हाला शब्द देतो…,” उद्धव ठाकरे त्या महिलेशी नेमकं काय बोले?

News Desk