HW News Marathi
महाराष्ट्र

आम्ही पवारांचे सर्व बालेकिल्ले उध्वस्त करत त्यांना पिंगा घालायला लावला !

मुंबई | यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपला ऐतिहासिक यश मिळाले तर काँग्रेस-राष्ट्रवादीला अनपेक्षित पराभवाचा सामना करावा लागला. याच पार्श्वभूमीवर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. “यंदाच्या लोकसभा निवडणुकीत आम्ही शरद पवारांचे सर्व बालेकिल्ले उध्वस्त करत आम्ही पवारांना पिंगा घालायला लावला”, असे खोचक विधान चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. येत्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता राजकीय पक्षांकडून पुन्हा एकमेकांवर निशाणा साधण्यास सुरुवात झाली आहे.

“यंदाच्या लोकसभा निवडणुकीत आम्ही शरद पवारांचे सर्व बालेकिल्ले उध्वस्त करत पवारांना जेरीस आणले. आम्ही पवारांना तिथेच अडकवून ठेवत पिंगा घालायला लावला”, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश मतदारसंघ हे राष्ट्रवादीचे बालेकिल्ले मानले जातात. याच ठिकाणी यंदा शरद पवार यांना मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. याच पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#SushantSinghRajput : अखेर रिया चक्रवर्ती ईडी कार्यालयात चौकशीसाठी पोहोचली

News Desk

संतांच्या भूमीत वारकऱ्यांवर अन्याय – चंद्रकांत पाटील

News Desk

राज्यात २२९ नवीन रुग्णांचे निदान, एकूण कोरोना बाधितांची संख्या १३६४

News Desk