HW Marathi
देश / विदेश महाराष्ट्र राजकारण

लोणीकरांसारख्या व्हिलनचा सुफडा-साफ करायला आम्हांला वेळ लागणार नाही..

जालना | शेतकरी मोर्चाला गर्दी जमवण्यासाठी वेळ पडला तर हिरॉइन आणू आणि हिरॉइन न मिळाल्यास आपल्या तहसीलदार मॅडम आहेतच,” असे बेताल वक्तव्य भाजप नेते आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी केले आहे. जालना जिल्ह्यातल्या परतूर गावातील एका जाहीर कार्यक्रमात बबनराव लोणीकर बोलत होते. जालन्यातील परतूर तालुक्यात कऱ्हाळाच्या ३३ केव्ही उपकेंद्राच्या लोकार्पण सोहळ्यात महिला तहसिलदारांचा थेट हिरोईन असा उल्लेख केला. लोणीकरांच्या या भाषणाची ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बबनराव लोणीकर यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीच्या महिला नेत्यांनी लोणीकरांचा खरपूस समाचार घेतला आहे. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली  चाकणकर म्हणाल्या, ”आम्ही जिजाऊ-सावित्रीच्या लेकी हिरोईन आहेतच. याची काळजी तुम्ही करु नका, पण तुमच्यासारखे व्हिलन आजूबाजूला असतील तर त्यांचा सुपडा साफ करायला आम्हाला वेळ लागणार नाही. सत्ता गेली पण सत्तेची मस्ती अजून गेलेली नाही. त्यामुळे बोलताना जरा भान ठेवा आणि काही वक्तव्य करताना जबाबदारीने करा,’ असं म्हणत चाकणकर यांनी लोणीकरांना झापलं.तर राष्ट्रवादीच्या आमदार विद्या चव्हाण यांनी या घटनेचा निषेध नोंदवला आहे,आणि ज्या तहसिलदार मॅडमच्या विरोधात असे वक्तव्य केले गेले त्या तहसिलदारांनी हे सहन करता तक्रार करावी असेदेखिल त्या म्हणाल्या आहेत .

बबनराव लोणीकर नेमके काय म्हणाले

लोणीकर म्हणाले की, “सरकारकडून २५ हजार रुपये अनुदान पाहिजे असेल तर मराठवाड्यातला सगळ्यात मोठा मोर्चा परतूरला करायचा का तुम्ही ठरवा. सगळ्या सरपंचांनी आपाआपल्या गावातून गाड्या आणल्या पाहिजेत. जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य सगळ्यांनी ताकद लावली तर महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा मोर्चा होऊ शकतो. आणि अधिवेशनाच्या आधी जर मोर्चा झाला, तर २५ हजार लोक आणेल, ५० हजार लोक आणेल, तुम्ही सांगा देवेंद्र फडणवीस यांना आणू, तुम्ही सांगा चंद्रकांतदादा पाटलांना आणू. तुम्ही सांगा सुधीर भाऊंना आणू. कुणाला आणायचे तुम्हाला वाटले तर मग एखादी हिरोईन आणायची तर हिरोईन आणू आणि नाही जर कोणी भेटले. तर तहसीलदार मॅडम हिरोईन आहेतच, त्या निवेदन घ्यायला येतील, असे भाषण बबनराव लोणीकरांनी केले आहे.

 

 

Related posts

आता शिवसेनेचे खासदार विरोधी बाकांवर बसणार !

News Desk

यापुढेही मी जनतेसाठी कार्यरत राहणार !

News Desk

पंकजा मुंडे देणार मंत्रिपदाचा राजीनामा ?

News Desk