HW News Marathi
महाराष्ट्र

‘आम्ही कोणाच्या अंगावर जात नाही, आलात तर सोडत नाही’, देवेंद्र फडणवीस

नागपूर। भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेना भवनासंदर्भात केलेल्या विधानानंतर त्यांच्या दिलगिरी व्यक्त करणाऱ्या व्हिडीओशिवाय भाजपाकडून अधिकृत अशी भूमिका आली नव्हती. त्यावर आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “तोडफोड करणं आमची संस्कृती नाही, आम्ही तोडफोड करत नाही”, असं फडणवीस म्हणाले आहेत. तसेच, “आम्ही कुणाच्या अंगावर जात नाही, आलं तर सोडत नाही”, असं देखील फडणवीस यांनी म्हटलं आहे. नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

आम्ही कोणाच्या अंगावर जात नाही आणि

“आमच्यासाठी विषय संपला आहे”

यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रसाद लाड यांच्या वक्तव्याविषयी विचारणा केली असता फडणवीस म्हणाले, “तोडफोड करणं आमची संस्कृती नाही. आम्ही तोडफोड करत नाही. काल प्रसाद लाड यांचे जे वक्तव्य समोर आले किंवा जे त्यांनी म्हटल्याचे सांगितले गेले, त्याबद्दल त्यांनी व्हिडीओद्वारे खुलासाही केला आहे. आमच्यासाठी विषय संपला आहे. आम्ही कोणाच्या अंगावर जात नाही आणि आला तर सोडत ही नाही”, असं फडणवीस यावेळी म्हणाले.

भाजपा आमदार प्रसाद लाड यांचं वादग्रस्त विधान

प्रसाद लाड यांनी शनिवारी माहिममध्ये भाजपा कार्यालयात झालेल्या एका कार्यक्रमामध्ये शिवसेना भवनासंदर्भात आक्षेपार्ह विधान केलं होतं. “आम्ही इथे आलो की यांना वाटतं शिवसेना भवन फोडायलाच आलो आहे. घाबरू नका. वेळ आली तर तेही करू”, असं प्रसाद लाड म्हणाले होते. या मुद्द्यावरून मोठ्या प्रमाणावर राजकीय वाद सुरू झाल्यानंतर रात्री उशिरा प्रसाद लाड यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर सारवासारव करणारा आणि दिलगिरी व्यक्त करणारा व्हिडीओ पोस्ट केला होता. “शिवसेना प्रमुख किंवा त्यांनी बांधलेल्या वास्तूचा मला अनादर करायचा नव्हता. असले की या व्हिडीओत प्रसाद लाड यांनी स्पष्ट केल आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी चक्रीवादळात प्रशासनासोबत मदतीला उभे रहावे ,शरद पवारांचे कार्यकर्त्यांना आवाहन

News Desk

सुप्रीम कोर्ट म्हणालं मराठा आरक्षण म्हणजे अल्ट्रा व्हायरस – गुणरत्न सदावर्ते

News Desk

पवारांचा नातू अपरिपक्व नाही हे वारंवार सिद्ध होतंय!

News Desk