मुंबई | “काल छगन भुजबळ यांनी स्वतः असे वक्तव्य आहे कि ‘मी आहे तिथे बरा आहे’. त्यामुळे चित्र स्पष्ट झालेच आहे. सगळ्यांनाच आमच्या पक्षात घ्यायला आमच्याकडे काही वॉशिंग मशीन नाही. आम्ही पारखून घेऊनच नेत्यांना पक्षात घेत असतो”, असे म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या पक्षप्रवेशावर भाष्य देखील केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून छगन भुजबळ पुन्हा आपल्या स्वगृही म्हणजेच शिवसेनेत परतणार असल्याच्या जोरदार चर्चा रंगत होत्या. मात्र, संजय राऊत यांनी आता या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
संजय राऊत यांनी यावेळी पक्षप्रवेशांबाबत बोलताना “सगळ्यांनाच आमच्या पक्षात घ्यायला आमच्याकडे काही वॉशिंग मशीन नाही”, असे म्हणत अप्रत्यक्षपणे भाजपला देखील टोला लगावला आहे. दरम्यान, नाशिक शिवसेना पदाधिकाऱ्यांचा छगन भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशाला तीव्र विरोध आहे. म्हणूनच, या पदाधिकाऱ्यांनी २४ ऑगस्ट मुंबईत मातोश्री येथे जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. यावेळी, “छगन भुजबळ हे येवला आणि नांदगावमधील जागा वाचवू शकत नाहीत अशी परिस्थिती आहे. त्यामुळे ते शिवसेनेत येत असून त्यांना पक्षात प्रवेश देऊ नये”, अशी मागणी शिवसैनिकांनी केली होती. त्यावेळी, छगन भुजबळ यांना शिवसेनेत घेणार नसल्याचे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना दिल्याचे वृत्त होते.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.