HW News Marathi
महाराष्ट्र

विरोधी पक्षात बसण्याची आमची मानसिकता !

मुंबई । विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठवडा उलटून ही राज्यात सरकार सत्ता स्थापन झाले नाही. मुख्यमंत्री आणि सत्तेचे समान वाटपावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये तणाव निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेनचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांची भेट घेतली. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसला विरोधी पक्षात बसण्यासाठी जनतेने कौल दिला आहे. त्यामुळे विरोधात बसण्याची आमची मानसिकता आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ दलाचे नेते अजित पवार यांनी म्हणाले आहे.

सध्याच्या राज्यातील राजकीय परिस्थितीबाबत भाष्य करताना अजित पवार म्हणाले की, ‘नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला विरोधी पक्षात बसण्यासाठी जनतेने कौल दिला आहे. त्यामुळे विरोधात बसण्याची आमची मानसिकता आहे.’ दरम्यान, शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या निवासस्थानी ‘सिल्वर ओक’ जाणून त्यांची भेट घेतली. राऊत आणि पवार यांच्या भेटबाबत आपल्याला माहिती नसल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करणे आपले प्रथम कर्तव्य! – उद्धव ठाकरे

Aprna

मुंबई होणार आता खड्डेमुक्त तर कामचुकार कंत्राटदारांवर होणार कारवाई – महापौर किशोरी पेडणेकर

News Desk

सिंधुताई सपकाळ यांना महाराणी अहिल्याबाई होळकर नारीशक्ती पुरस्कार जाहीर

Gauri Tilekar