HW News Marathi
महाराष्ट्र

आमचं युतीबाबत ठरलंय…अन्य कोणीही त्यात तोंड घालू नये !

मुंबई | “भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमचे युतीबाबत ठरले आहे. अन्य कोणीही त्यात तोंड घालू नये”, अशी प्रतिक्रिया शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. गिरीश महाजन यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबतच्या वक्तव्याबद्दल पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उद्धव ठाकरे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. “मुख्यमंत्री हा भाजपचा व्हावा अशीच सर्वांची इच्छा आहे. राज्यातील निकाल पाहता मुख्यमंत्री कोणाचा व्हावा हे सांगण्याची गरज नाही”, असे विधान गिरीश महाजन यांनी केले आहे.

येत्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून भाजप-शिवसेनेत धुसफूस सुरु आहेच. त्याचप्रमाणे, सुरुवातीपासूनच शिवसेना मुख्यमंत्रीपदासाठी आग्रही असल्याचे चित्र स्पष्ट आहे. मात्र, आता जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या एका विधानानंतर राज्यातही शिवसेनेला धाकट्या भावाचीच भूमिका बजावावी लागणार का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

“लोकसभा निवडणुकीत भाजपच्या सर्वाधिक जागा निवडणून आल्या आहेत. शिवसेनेच्या जागा निवडून येण्यासाठीसुद्धा भाजपने प्रयत्न केले आहेत. आम्हाला सर्वांना असे वाटते कि, मुख्यमंत्रीपद भाजपकडे राहावे. मोठा भाऊ म्हणून सुद्धा आमची हीच भूमिका आहे. तसेच राज्यातील निकाल पाहता मुख्यमंत्री कुणाचा व्हावा हे सांगण्याची गरज नाही”, असे गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भारतीय पोलीस सेवेतील परिविक्षाधीन अधिकाऱ्यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट

News Desk

मालेगाव तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना महिन्याभरात लाभ मिळणार! – विजय वडेट्टीवार

Aprna

मुख्यमंत्र्यांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका

News Desk