HW News Marathi
Covid-19

मराठा आरक्षणासाठी पंतप्रधान मोदींची भेट घेणार ! जयंत पाटलांची माहिती

मुंबई । “मराठा आरक्षणासाठी पंतप्रधान मोदी यांची भेट घेऊन चर्चा करण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत”, असे मोठे विधान राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले आहे. खरंतर,

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्याने राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. त्यातच मराठा आरक्षणासाठी एकीकडे शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्यापाठोपाठ खासदार संभाजी छत्रपती यांनीही आंदोलनाची हाक दिली आहे. तर दुसरीकडे भाजप अन्य नेते वारंवार महाविकास आघाडी सरकारला कोंडीत पकडत आहेत. अशातच आता जयंत पाटील यांनी मोठी माहिती दिली आहे.

जयंत पाटील यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना असे म्हणाले की, “मराठा आरक्षणाला सगळ्या स्तरातून, वेगळ्या पक्ष आणि संघटनांकडून पाठिंबा मिळालेला आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयात याबाबत वेगळा निर्णय झाला. तरीही राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र, आता मराठा आरक्षणासाठी संसदेत आवाज उठवण्याची गरज आहे. म्हणूनच आता मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार पंतप्रधान मोदी यांची भेट घेऊन मागणी करणार आहे”, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली आहे. त्यामुळे हा चेंडू आता लवकरच केंद्राच्या कोर्टात जाणार आहे.

 

काय म्हणाले उदयनराजे ?

उदयनराजे म्हणाले की, “मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आंदोलन करायची वेळ येते ही दुर्दैवाची गोष्ट आहे. राज्य सरकारने आता लवकरात लवकर मराठा आरक्षणासंदर्भातील आपली भूमिका जाहीर करावी”, अशी मागणी उदयनराजे भोसले यांनी यावेळी केली. मराठा समाज आपल्या लोकप्रतिनिधींकडे डोळे लावून बसले आहेत. त्यामुळे पुढेमागे उद्रेक झाला तर त्यासाठी राज्यकर्ते जबाबदार असतील. आता आरक्षणासाठी अधिवेशन बोलवण्याची गरजच आहे. आता ‘दूध का दूध, पानी का पानी’ झालेच पाहिजे”, असे उदयनराजे यावेळी म्हणाले.

तसेच, संभाजीराजे छत्रपती हे माझे धाकटे भाऊ आहेत. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत, असेही यावेळी उदयनराजे भोसले यांनी स्पष्ट केले आहे.

संभाजीराजेंची घोषणा काय ?

संभाजीराजे यांनी आज (6 जून) मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाची घोषणा केली आहे. “छत्रपती शाहू महाराजांच्या कोल्हापूरमधील समाधी स्थळावरूनच 16 जूनपासून आम्ही आंदोलनाला सुरुवात करणार आहोत”, अशी घोषणा संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शाळा सुरू करण्यासंदर्भात मुख्यमंत्री टास्क फोर्सशी चर्चा करणार, राजेश टोपेंची माहिती!

News Desk

कोरोनाची लक्षणे नसल्यास किंवा सौम्य लक्षणे असल्यास आता घरीच विलगीकरण करता येणार, जाणून घ्या नियम

News Desk

मुंबईच्या योगदानाची परतफेड करण्याची हीच ती वेळ

News Desk