मुंबई | “फॅसिस्टविरोधात समविचारी पक्षांनी एकत्र यायला हवे,” असा दावा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे. “भाजपविरोधात सगळ्यांनी एकत्र येणे गरजेचे आहे, असे विश्वास बॅनर्जींनी व्यक्त केला आहे.” बॅनर्जींनी आज (१ डिसेंबर) राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारसोबत झालेल्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना म्हणाल्या.
दरम्यान, यूपीएबद्द पत्रकारांनी प्रश्न विचरल्यावर बॅनर्जी म्हणाले, “काय आहे यूपीए, आता यूपीए नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती लवकरच बरी व्हावी. मुख्यमंत्री बरे व्हावे, यासाठी प्रार्थना केली असून मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी आल्याचे बॅनर्जींनी यावेळी सांगितले. फॅसिस्टविरोधात सक्षण पर्याय द्याला हवा. देशातील फॅसिस्टविरोधात सक्षण पर्याय द्याला हवा,” असेही त्या म्हटले.
A firm alternative course should be made as nobody's fighting against ongoing fascism. Sharad Ji is the seniormost leader & I came to discuss our political parties. I agree with whatever Sharad Ji said. There is no UPA: WB CM Mamata Banerjee after meeting NCP Chief Sharad Pawar pic.twitter.com/P2GdlA9JlA
— ANI (@ANI) December 1, 2021
भाजपविरोधात सर्वांनी एकत्र यावे – शरद पवार
पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्राचे जुने नाते आहे. हे नाते सक्षम करण्यासाठी बॅनर्जी या मुंबईत आल्या असल्याचे पवारांनी सांगितले. भाजपविरोधातील नव्या आघाडीची तयारी सुरू असताना काँग्रेसला बाजुला केले जात असलेल्या पत्रकारांच्या प्रश्नावर पवार म्हणाले, “जे भाजपविरोधात आहेत, त्या सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे, असे पवारांनी म्हटले आहे. तसेच मोदीविरोधात सर्वजण एकत्र येणार असेल तर त्यांचे कोण नेतृत्त्व करणार यावर प्रश्नावर पवार म्हणाले, “भाजपविरोधात सर्वांनी एकत्र येणे गरजेचे असून नेतृत्त्व कोण करणार हा दुसरा मुद्दा आहे.”
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.