मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत लोकल ट्रेन केवळअत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी सुरु आहेत. हळूहळू काही आणखी प्रवाशांना प्रवासाची मुभा सरकार देत आहेसहकारी आणि खाजगी बँक कर्मचाऱ्यांनाही लोकल ट्रेनने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. पण कर्मचाऱ्यांची लोकल ट्रेनमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. महिलांच्या डब्यातही मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेने महिलांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
उद्यापासून (२८ सप्टेंबर) विरार ते चर्चगेट आणि चर्चगेट ते विरारसाठी विशेष ट्रेन सुरु केली जाणार आहेविरार ते चर्चगेटसाठी सकाळी ७.३५ ची लोकल रवाना होणार आहे. तर चर्चगेट ते विरारसाठी संध्याकाळी ६.१० वाजता दुसरी लोकल सुरु रवाना होणार आहे.पश्चिम रेल्वे मार्गावर दररोज ३५० विशेष लोकल ट्रेन चालवल्या जात होत्या. मात्र, प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेत लोकल ट्रेनच्या फेऱ्यांमध्ये वाढ केली आहे. ट्रेनमध्ये जास्त गर्दी होऊ नये आणि सोशल डिस्टन्सिंग पाळली जावी त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
लोकल ट्रेनमध्ये अत्यावश्यक सेवेच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही कर्मचाऱ्याला प्रवेश नसणार आहे. त्यासोबत लोकलबाबत पसरल्या जाणाऱ्या अफवांबाबत कोणीही विश्वास ठेवू नये, असे आवानही रेल्वेकडून करण्यात आले आहे.
For Ladies essential staff..
SIX ADDITIONAL ESSENTIAL SERVICES INCLUDING TWO LADIES SPECIAL WEF 28.09.2020 @Central_Railway @Gmwrly @PiyushGoyalOffc @RailwaySeva @RailMinIndia pic.twitter.com/ocRSgiWO1h— DRM – Mumbai Central, WR (@drmbct) September 26, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.