HW Marathi
महाराष्ट्र मुंबई राजकारण

नाणार प्रकल्पावर मुख्यमंत्री काय भूमिका घेणार?

nanar project

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दोन दिवसीय कोकण दौऱ्यावर रवाना झाले आहेत. मुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे कोकण दौरा करणार आहेत. सध्याचा ज्वलंत विषय म्हणजे नाार प्रकल्प आणि त्यावर मुख्यमंत्री काय निर्णय देणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. दरम्यान, दोन दिवसांपुर्वी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर नाणार रिफायनरीची जाहिरीत प्रसिद्ध केली होती. या जाहिरातीमुळे नाणार विरोध मावळल्याची शक्यता वर्तवण्यात आली तसेच त्यांच्या कोकण दौऱ्यावर नाणार प्रकल्पविरोधी समिती आक्रमक झाल्याचेही दिसून आले. 

भाजपसोबत सत्तेत असताना शिवसेनेने कायम नाणार प्रकल्पाला विरोध केला होता. उद्धव ठाकरेंनी यांनी गेल्या वर्षी (२०१९) एप्रिल महिन्यात नाणारला भेट दिली होती. नाणार जाणार नाही, तर इथे होऊ घातलेला प्रकल्प जाणार, अशी स्पष्ट भूमिकाही त्यांनी घेतली होती. नाणार प्रकल्पाच्या निमित्ताने सेना आणि भाजप आमनेसामने आल्याचे चित्रदेखील पाहायला मिळाले होते.

नाणारची काय होती जाहिरात?

सामनाच्या कोकण आवृत्तीच्या पहिल्याच पानावर १४ फेब्रुवारीला रत्नागिरी रिफायनरी अ‍ॅण्ड पेट्रोकेमिकल्स लिमिटेडची (आरआरपीसीएल) जाहिरात छापून आली. नाणारमुळे स्थानिकांना रोजगार आणि उत्तम शैक्षणिक सुविधा उपलब्ध होतील, तसेच ‘रत्नागिरी रिफायनरीचे प्रत्येक पाऊल कोकणवासियांच्या उन्नतीसाठीच’, असा मजकूर या जाहिरातीत लिहिला होता.

Related posts

महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा

rasika shinde

मराठा आरक्षणावरुन हायकोर्टाचे राज्यसरकारला खडे बोल

News Desk

भायखळा राष्ट्रवादीकडून धाडसी सुनीता पाटील यांचा सत्कार

News Desk