HW Marathi
महाराष्ट्र

भाजपने जे पेरले तेच उगत आहे- राज ठाकरे

मुंबईः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा केंद्र व राज्य सरकारच्या कारभारावर टीका केली आहे. यावेळी त्यांनी व्यंगचित्रांऐवजी शाब्दिक हल्ला चढवला आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने जे पेरले तेच आता उगवले आहे. खोटी माहिती पसरवण्यासाठी आणि लोकांची मने कलुषित करण्यासाठी भाजपने सोशल मीडिया नावाचे अस्त्र वापरलेतेच आता त्यांच्यावर बुमरँग झाले आहेअसे ते म्हणाले.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सभांमध्ये भाजपकडून दिलेली आश्वासने सत्तेत आल्यानंतरही पाळली नाहीत,याकडेही राज यांनी लक्ष वेधले. भाजपने निवडणुका जिंकण्यासाठी वाटेल ती आश्वासने दिली. लोकांची मने भडकवण्यासाठी खोट्याचे खरे करून दाखवले. विरोध करणाऱ्यांना ट्रोल करून शिवीगाळ केली. त्यांचे खच्चीकरण केलेअसेही ते म्हणाले.

Related posts

आजच्या पिढ्यांनी पाहिलेले दुष्काळाचे हे चित्र, पुढच्या पिढीला दिसणार नाही !

News Desk

‘कोरोना’मुळे ५६ वर्षीय हेडकॉन्स्टेबलचा मृत्यू, पोलीस दलातील तिसरा बळी

News Desk

मराठा आरक्षण : श्रेय घेण्यासाठी शिवसेनेने काहीच केले नाही !

News Desk