HW News Marathi
Covid-19

विधानपरिषदेची उमेदवारी डावल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले

मुंबई | विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपचे चार नवे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. मात्र, पक्षातील जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राज्यातील पक्ष नेतृत्वावर उघडपणे नाराजी व्यक्त केली. मात्र, विधानसभा आणि विधानपरिषदेचे तिकीट न मिळालेले माजी ऊर्जा मंत्री बावनकुठे यांनी पहिल्यांदा मौन सोडले आहे. बावनकुळे म्हणाले, पक्ष नेतृत्वाला कादाचित नवीन चेहऱ्यांना संधी देण्याची गरज वाटत असेल. त्यामुळे विधानसभा आणि विधानपरिषदेचे उमेदवारी दिली नसावी, असे त्यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना म्हणाले.

बावनकुळे म्हटले, “मी १५ वर्ष आमदार आणि ५ वर्ष ऊर्जा मंत्री होती. त्यावेळी पक्षाला मी आमदार आणि ऊर्जा मंत्री म्हणून उपयोगिता वाटत असावी. आज कदाचित पक्षाला तशी उपयोगिता वाटत नसवाी. यामुळे कदाचित पक्षनेतृत्वाने मला संधी न देता नवीन चेहऱ्यांना संधी दिली. विधानसभेच्या निडवणुकीच्या वेळी मला पक्षाने आठ मतदारसंघाची जबाबदारी दिली होती. त्यापासून मी पक्षासाठी काम करत आहे. पक्षाने मला खूप काही दिली असताना पक्षनेतृत्वाच्या आदेशाचे मी पालन करतोय,” असे ते म्हणाले.

विधीमंडळातील ९९ टक्के आमदार माझ्या कामाने समाधानी होते. ते आजही माझे नाव घेतात, आणि हिच माझ्या कामाची पावती असल्याचे बावनकुळे म्हणतात. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या कालच्या बोलण्यात पक्षाची भूमिका ठरलेली दिसते. त्यामुळे नवीन कार्यकर्त्यांना चेहऱ्यांना संधी देणे ही पक्षाची भूमिका आहे. तसेच मी गेल्या २८ वर्षपासून पक्षाचे काम करत आहे आणि यापुढेही करत राहणार, पक्ष देईल ती जबाबदारी मी पार पाडणार असल्याचे बावनकुळे म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांसाठी विशेष टास्क फोर्सची स्थापन करणार !

News Desk

रशियात कोरोना विरुद्धची लस तयार, मानवी चाचणी यशस्वी झाल्याचा दावा !

News Desk

राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरु, आता पुन्हा लॉकडाऊन नाही !

News Desk