HW News Marathi
महाराष्ट्र

तुम्ही २०००मध्ये काय केले? ठाकरेंचा पवारांना उलट सवाल

मुंबई। शरद पवारांच्या ईडी प्रकरणावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांवरील केल्या खटल्याची आठवण सांगत त्यांच्यावर टीका केली. ‘शरद पवार आता म्हणतायत की सत्ताधारी ईडीची कारवाई करून सूडाचे राजकारण करत आहे. मग २००० साली त्यांनी तरी काय केले होते?’ असा उलट सवाल करत उद्धव ठाकरेंनी उपस्थित करत त्यांना खडेबोल सुनावले.

उद्धव ठाकरे म्हणाले की, शरद पवार ईडीसमोर गेले, त्यांनी लढाई केली आणि ईडी घाबरली. नक्की काय मला माहीत नाही. सूडाने राजकारण केले जातेय असा दावा केला. असेलही आणि नसेलही. पण जर सूडाचे राजकारण कुणी इथे करत असेल, तर ते मोडून काढल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही’, असे स्पष्ट मतही उद्धव ठाकरेंनी वेळी मांडले. मात्र, ‘शरद पवार आज म्हणतायत सूडाचे राजकारण. पण २००० साली तुम्ही बाळासाहेबांवर खटला टाकून काय केले होते, असा सवाल उद्धव ठाकरेंनी पवारांना विचारला.

महाराष्ट्र ८ दिवस पेटता का ठेवला?’ असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. ‘शरद पवार, सामना नेहमी वाचाल, तर तुम्हीही वाचाल २००० साली सामनामधला एक अग्रलेख शोधून काढला आणि गुन्हा दाखल केला. तुम्ही ईडीसमोर न बोलावता गेला असाल, पण तेव्हा स्वत: बाळासाहेब ठाकरे सुद्धा कोर्टासमोर हजर झाले होते. तेव्हा तुम्ही ती तांत्रिक अटक दाखवली. तेव्हा कोर्टाने ती केस रद्द केली. आता तुम्ही आम्हाला सांगताय, की सूडाचे राजकारण केले जातेय?’, असे देखील उद्धव ठाकरे म्हणाले.

अजित पवार म्हणतात मगरीच्या डोळ्यांत अश्रू !

यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी अजित पवार यांच्यावर देखील तोंडसुख घेतले. ‘आतापर्यंत मगरीच्या डोळ्यांत अश्रू हे पाहिले होते. पाहिले पहिल्यांदा. म्हणे राजकारणाचा स्तर खालावलाय. आता मी शेती करणार. पण धरणात पाणी नसेल, तेव्हा काय करणार? जेव्हा आमचा शेतकरी डोळ्यांत पाणी घेऊन धरणात पाणी नाही हे सांगायला आला होता, तेव्हा तुम्ही ऐकले नाही. तुमच्या कर्माने तुमच्या डोळ्यांत पाणी आले आहे. जे शस्त्र तुम्ही शिवसेनेवर उगारले होते, तेच शस्त्र आज तुमच्यावर आलेय’, अशा शब्दांत त्यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पोलिसांना शक्य असल्यास चहा, जेवण द्या, पोलीस आयुक्त हेमंत नगराळेंचं नागरिकांना भावनिक आवाहन

News Desk

चक्रीवादळामुळे रायगडमध्ये २ बळी, भिंत कोसळून झाला मृत्यू

News Desk

औद्योगिक विकासासाठी उत्तम शैक्षणिक व्यवस्था निर्माण करणे गरजेचे! – देवेंद्र फडणवीस

Aprna