HW News Marathi
महाराष्ट्र

वानखेडेंचे वैयक्तिक आयुष्य आणि ड्रग्जचा काय संबंध? क्रांती रेडकर भडकल्या

मुंबई। एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर आणि वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी आज केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची भेट घेतली. या भेटीनंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत क्रांती रेडकर प्रश्नोत्तरावेळी चांगल्याच भडकल्या. कोणाचा नवरा कोण आहे याविषयी नवाब मलिकांना काय करायचे आहे. समीर वानखेडे यांचे वयक्तिक आयुष्य आणि ड्रग्ज केसचा काय संबंध,असा प्रश्न समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी उपस्थित केला. तर मलिकांचे जावई समीर खान यांच्याकडे किती किलो ड्रग्ज मिळाले याविषयी कोणी काही का विचारत नाही,असे देखील क्रांती रेडकर म्हणाल्या.

नवाब मलिकांनी सर्वांना समीर वानखेडेंमध्ये व्यस्त करुन ठेवले

नवाब मलिक ड्रग्जविषयी बोलत नाही. त्यांना समीर वानखेडेंच्या वयक्तिक आयुष्यावर बोलण्याचा काय हक्क आहे. मलिक यांचा जावई ड्रग्ज प्रकरणात अडकला त्याचा आणि समीर वानखेडे हिंदू आहेत की मुस्लिम याचा एकमेकांशी काय संबंध आहे, असा प्रश्न क्रांती रेडकर यांनी केला आहे. नवाब मलिकांनी सर्वांना समीर वानखेडेंमध्ये व्यस्त करुन ठेवले आहे त्यामुळे समीर खान विषयी कोणीही प्रश्न विचारत नाही, असा हल्लाबोल क्रांती रेडकर यांनी नवाब मलिकांवर केला आहे. तसेच आर्यन खान विषयीच्या प्रश्नांवर बोलण्यासाठी आम्ही एनसीबीचे अधिकारी नाही. आर्यन खानविषयीचे प्रश्न एनसीबी कार्यालयात जाऊन विचारावेत असे देखील क्रांती रेडकर म्हणाल्या.

त्यामुळे आता समीर वानखेडे फ्रॉड आहेत की नवाब मलिक हे लवकरच सर्वांसमोर येईल

नवाब मलिक हे खूप मोठे नेते आहेत. ते आमच्यावर रोज नवीन आरोप करत नवीन पुरावे सादर करत आहेत ज्यात काहीही तथ्य नाही. नवाब मलिक मीडियासमोर येऊन काही कागदपत्रे दाखवत असतील आणि तुम्ही ते सत्य मानत असाल तर कृपा करुन डोळे उघडा, अशी विनंती यावेळी क्रांती रेडकर यांनी केली. नवाब मलिक मोठे नेते आहेत तर आता आमच्या पाठीशीही एक मोठा नेता आहे. आम्ही त्यांना पुरावे देणार आहोत. त्यामुळे आता समीर वानखेडे फ्रॉड आहेत की नवाब मलिक हे लवकरच सर्वांसमोर येईल, असे क्रांती रेडकर म्हणाल्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रांजणगाव येथे इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर उभारणार! – राजीव चंद्रशेखर

Aprna

माझे नेते मोदी आणि शहा ! पंकजा मुंडेंचा रोख फडणवीसांवर ?

News Desk

भिमा कोरेगावचे पडसाद उल्हासनगरात . संपुर्ण शहर बंद .

News Desk