HW News Marathi
महाराष्ट्र

INS विक्रांतसाठी जमा केलेले पैसे कुठे गेले? संजय राऊतांचा किरीट सोमय्यांवर हल्लाबोल

नवी दिल्ली | ईडी म्हणजेच अंमलबजावणी संचालनालयाने मंगळवारी (5 एप्रिल) स्वतःवर केलेल्या कारवाईनंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला चढवला आहे. संजय राऊत यांनी एका आरटीआयचा हवाला देत असा आरोप केला आहे की, किरीट सोमय्या यांनी आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी सर्वसामान्य जनतेकडून पैसे जमा केले होते. मात्र, ते पैसे राजभवनापर्यंत पोहोचलेच नाहीत, असा दावा संजय राऊतांनी केला आहे. आज राऊतांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. 

जमीन व्यवहारांशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने कारवाई केल्यानंतर संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर आरोप करत आयएनएस विक्रांतला वाचवण्यासाठी तुम्ही जमा केलेले पैसे कुठे गेले? असा सवाल केला आहे. संजय राऊत किरीट सोमय्या यांच्यावर टीका करताना म्हणाले की, 2019 मध्ये भाजपने आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी मोहीम सुरू केली होती आणि लोकांकडून पैसे गोळा केले होते. हे पैसे राजभवनात जमा करायचे होते आणि तेव्हा किरीट सोमय्या यांनी राजभवनात पैसे जमा करण्याबाबत बोलले होते, मात्र त्यांनी राजभवनाकडून माहिती मागवली असता, तसे पैसे मिळाले नाहीत, असा गंभीर आरोप राऊतांनी केला आहे. 

यासोबतच द काश्मीर फाईलपेक्षाही ‘INS विक्रांत फाईल’ ही फाईल मोठी असल्याचा दावा संजय राऊतांनी केला आहे. महाराष्ट्रात ईडीने शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर कारवाई केली आहे. 1,034 कोटी रुपयांच्या पत्रा चाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने राऊतांची मालमत्ता जप्त केली आहे. तसेच राऊतांचा अलिबाग येथील भूखंड आणि दादर येथील फ्लॅट ईडीने आयएनएस विक्रांतसाठी जमा केलेले पैसे कुठे गेलेजप्त केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आता ‘सरकारच्या संकटमोचन’ संजय राऊतांनी धावून यावे !, शेलारांची टीका

News Desk

पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात थेट संजय राठोड यांचें नाव घेणं उचित नाही – एकनाथ शिंदे

News Desk

अजित पवारांनी कोल्हापूर दौऱ्यात पूरस्थितीबाबत केल्या महत्त्वाच्या घोषणा…!

News Desk