HW News Marathi
महाराष्ट्र

आज कोल्हापुरात वाहतुकीसाठी ‘कोणते’ मार्ग सुरू होणार

कोल्हापूर । गेल्या सहा दिवसापासून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे येथे पूरस्थिती निर्माण झाला आहे. यामुळे येथील ग्रामस्थांचे जनजीवन विस्कळीत झाले असून दोन्ही जिल्ह्यांमध्ये जीवनावश्यक वस्तूंसह पिण्याचा पाण्याचीही भीषण टंचाई निर्माण झाली आहे. दोन्ही जिल्ह्यासाठी वरदान असणारे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार अजूनही बंदच आहे. शिरोलीनजीक अजूनही जवळपास साडे तीन ते चार फुट पाणी आहे. त्याचसरोबर सरनोबतवाडीनजीकही महामार्ग अजूनही पाण्याखाली आहे.

कोल्हापूर नेमके कोणते मार्ग वाहतुकीसाठी सुरू

  • गारगोटी कोल्हापूर मार्गावर वाहतूक सुरू
  • भुदरगड तालुक्यातील सर्व मार्गावर वाहतूक पूर्ववत सुरू झाल्याने जनजीवन हळूहळू पूर्वपदावर
  • गारगोटी कुर मडिलगे कोल्हापूर मार्गावर वाहतूक सुरू
  • गारगोटी – मुदाळतिट्टा – कोल्हापूर हा रस्ता वाहतुकीसाठी नवव्या दिवशी खुला
  • मुरगुड- मुदाळतिट्टा हा मार्ग वाहतुकीसाठी खूला होण्याची शक्यता
  • मुरगुड -चिमगाव- गंगापूर- मडीलगे- गारगोटी व कोल्हापूर मार्गे वाहतूक सुरू
  • कोगनोळीपासून निपाणीपर्यंत महामार्ग वाहतुकीसाठी खुला

कापशी- मुरगुड मार्गावर सरपिराजी तलाव्याच्या सांडव्यावरून पाण्याचा जास्त विसर्ग होत आसल्याने वाहतूक बंदच राहणार असून दुधगंगा नदीचे कोंगनोळी येथे रोडवर आलेले पाणी अजुनही कमी झाले नसल्याने कागल शहराकडे जाण्याचा रस्ता आजुनही बंद हे दोन मार्ग अद्याप वाहतुकीसाठी खुले केले नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोथरूडमध्ये लवकरच उभारणार ग.दि. माडगूळकर यांचे स्मारक

Gauri Tilekar

मराठा आरक्षण रद्द, पण वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

News Desk

दुसऱ्यांच्या मुलांचं बारसं करण्याची शिवसेनेला सवयच – राणे

News Desk