HW News Marathi
महाराष्ट्र

मुलाखत सुरू असताना केंद्रीय मंत्र्यांच्या डोक्यात घुसली काच

नागपूरः मुलाखतीदरम्यान लाइट फुटून डोक्याला मार लागल्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी जखमी झाले आहेत. एका वृत्तवाहिनीच्या इंटरव्ह्यूदरम्यान अचानक स्पॉटलाइट फुटल्याने त्यांच्या डोक्याला काच लागली आहे.

शनिवारी ही घटना घडली होती. गडकरींची प्रकृती ठीक असून त्यांना विश्रांतीचा सल्ला दिल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. तरी देखील ते रविवारी एका कार्यक्रमाला उपस्थित होते. गडकरी कॅमेर्‍यासमोर बसले होते. अचानक कॅमर्‍याचा स्पॉटलाइट फुटून त्याच्या काचेचा एक तुकडा गडकरीच्या डोक्याला लागला. यात गडकरी किरकोळ जखमी झाले आहेत. जखमी झाल्यानंतरही गडकरी इंटरव्ह्यू देण्यात तयार होते. परंतु त्यानंतर त्यांना सेंट्रल एव्हेन्यू येथील रहाटे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तातडीने त्यांच्या डोक्यातील काचेचा तुकडा काढला. अर्धा तासानंतर डॉक्टरांनी त्यांना घरी जाण्यास सांगितले. डॉक्टरांनी गडकरींना विश्रांतीचा सल्ला दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“सांडपाणी विकून नागपूरला 325 कोटी मिळतात” – नितीन गडकरी

News Desk

आमचा उमेदवार हरला तरी पर्वा नाही ! पोटनिवडणुकीबाबत फडणवीसांंचं मोठं विधान

News Desk

विरोधकांनी एकत्र येऊन मोदींविरोधात मजबूत संघटन निर्माण करण्याची गरज आहे – संजय राऊत 

News Desk