HW News Marathi
महाराष्ट्र

अनिल देशमुखांच्या विरोधात याचिका दाखल करण्याऱ्या ॲड जयश्री पाटील कोण आहेत?

मुंबई | राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पक्षही लिहिले होते. त्यानंतर त्यांनी कोर्टाचे दारही ठोठावले होते. सर्वोच्च न्यायालयाने परमबीर सिंग यांनी फटकारल्यानतंर सिंग उच्च न्यायालयात गेले होते. आज (५ एप्रिल) उच्च न्यायालयाने याबद्दल सुनावणी केली असून आथा परमबीर सिंग यांच्या या आरोपाची चौकशी सीबीआयकडे वर्ग करण्यात आली आहे. दरम्यान, आज ज्या याचिकाकर्त्याच्या अर्जावर ही सुनावणी झाली त्या अॅड जयश्री पाटील कोण आहेत हे जाणून घेऊयात.

जयश्री पाटील यांनी अनिल देशमुख यांच्याविरोधात मुंबईच्या मलबार हिल पोलिसांकडे तक्रारही दाखल केली होती. भ्रष्टाचाराचे पुरावे नष्ट होण्याअगोदर भ्रष्टाचारविरोधी कायद्याखाली संबंधित व्यक्ती आणि मंत्र्याला अटक व्हावे,” अशी मागणी त्यांनी आपल्या तक्रारीत केली होती. या तक्रारीत त्यांनी शरद पवार यांचंही नाव लिहिलं होतं. त्यामुळे आज हायकोर्टाने जो निर्णय सुनावला तो जयश्री पाटील यांनी याचिका सादर केली होती त्यावर सुनावला आहे.त्यानुसार सीबीआयला १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

तर ॲड जयश्री पाटील या ॲड गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी आहेत. गुणरत्न सदावर्ते हे मराठा आरक्षणाच्या विरोधातील याचिकाकर्ते आहेत. महाराष्ट्रामध्ये मराठ्यांना अारक्षण देऊ नये यासाठी ते सर्वोच्च न्यायालयात याचिका लढवत आहेत.सध्या मराठा आरक्षणाला विरोध करणा-या याचिकेवरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे, त्या याचिकाकर्त्यांपैकी एक म्हणजे ॲड जयश्री पाटील होय.

ॲड गुणरत्न सदावर्ते यांच्यासोबतच्या मराठा आरक्षणविरोधातील याचिकाकर्त्या म्हणून त्यांची याचिका सर्वोच्च न्यायालयात आहे. जयश्री पाटील यांनीही सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाला विरोध जाहीर केला आहे. ॲड सदावर्ते यांच्या ॲड जयश्री पाटील या पत्नी आहेत. दोघांनी मिळूनच मराठा आरक्षणाला विरोध करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती.

२०१४च्या मराठा आरक्षण कायद्यास न्यायालयात आव्हान देणारे ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. एल. के. पाटील यांच्या त्या कन्या आहेत.तसेच, न्या. लोया प्रकरणात अमित शहा यांच्या विरोधात जयश्री पाटील यांनी याचिका दाखल केली होती. त्याच जयश्री पाटील या मराठा आरक्षण विरोधातील याचिकाकर्त्या आहेत. सदावर्ते हे पाटील यांचे वकील आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“माझा मनसुख हिरेन करण्याचा ठाकरे सरकारचा कट”, किरीट सोमय्यांचा आरोप

Aprna

बॉम्बे आयआयटीने तयार केले ‘SAFE ॲप ‘

swarit

… याचा अर्थ भाजपला लोकांनी नाकारले आहे; नवाब मलिकांचा हल्लाबोल

News Desk