HW News Marathi
महाराष्ट्र

ईडी कडून ज्यांना नोटीस गेली ते अनिल परब नेमके कोण आहेत?

मुंबई | महाविकास आघाडी सरकारवर ईडीचं सावट आहे असं म्हटलं जातंय,त्यात तथ्यही आहेत.चौकशी लागणाऱ्या नेत्यांची यादी रोज वाढतेय.यातच आता भर म्हणजे परिवनमंत्री अनिल परब यांना ईडीकडून नोटीस आली आहे. महाविकास आघाडीच्या विरोधात हा भाजपचा कट आहे असा दावा सरकार कडून केला जात आहे. मात्र ईडीकडून नोटीस आलेले नेते अनिल परब नेमके आहेत तरी कोण?ते शिवसेनेसाठी इतके महत्वाचे का आहेत ?

कोण आहेत अनिल परब?

56 वर्षीय अनिल परब हे महाराष्ट्र विधान परिषदेत तीन वेळा शिवसेनेचे आमदार राहिले आहेत.डिसेंबर 2019 मध्ये मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना राज्य मंत्रिमंडळात सामावून घेतलं.व्यवसायाने वकील असलेले परब हे ठाकरेंवरील निष्ठेसाठी ओळखले जातात. आपल्या आक्रमक राजकीय शैलीव्यतिरिक्त, ते पक्षाचे कायदेशीर मुद्दे हाताळतात आणि निवडणुकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.

2001 पासून ते शिवसेनेचै विभागीय प्रमुख आहेत आणि दोन विभागांची जबाबदारीअसणारे ते एकमेव नेते आहेत, त्यांचे कार्यक्षेत्र र वांद्रे ते अंधेरी पर्यंत पसरलेले आहे.

अनिल परबांची चौकशी का ? काय आहे प्रकरण?

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात अपशब्द काढल्याने त्यांना अटक करण्यात आली होती. मात्र त्यांच्या अटकेपूर्वी अनिल परब यांचा एक विडिओ व्हायरल झाला होता.अनिल परब फोनवरून पोलिसांनी राणेंच्या अटकेविषयी सुचना देत होते असा आरोप त्याच्यांवर आहे.त्यामुळे ते भाजपचा रडारवर होते त्यातच त्यांना मंगळवारी ईडीसमोर हजर राहण्यास सांगितले आहे. पण परबांना का बोलावले आहे याबाबत अद्याप स्पष्टता नाही.

अनिल परब यांचं सेनेत काय स्थान?

२०१५ मध्ये वांद्रे पश्चिम मधून काँग्रेस कडून लढणाऱ्या राणेंना पराभूत करण्यात अनिल परबांची भूमिका महत्वाची होती.२०१७ मध्ये मनसेचे ६ नगरसेवक शिवसेनेत घेण्यात वाटा होता आणि भाजपने युती तोडल्यानंतर आणि मुंबईच्या महानगरपालिका स्वतंत्रपणे लढल्यानंतर 2017 मध्ये परब यांना महत्त्व प्राप्त झाले. निवडणुकांदरम्यान, परब यांनी बीएमसीमधील भ्रष्टाचाराच्या आरोपांवर सेनेला कोंडण्याचा प्रयत्न करण्याऱ्या भाजपच्या सर्व हल्ल्यांचा प्रतिकार केला.

वर्षानुवर्षे परब यांची मातोश्रीशी जवळीक वाढली आणि त्यांनी पक्षात महत्त्वाच्या भूमिका बजावून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा विश्वास संपादन केला. 2019 च्या लोकसभा आणि राज्य विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या निवडणूक धोरणांमध्येही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.गृहनिर्माण, कायदेशीर, बीएमसी, प्रशासन आणि इतर कोणत्याही महत्त्वाच्या बाबींवर पक्ष नेतृत्व परबचा सल्ला घेते जे पक्षासाठी महत्त्वाचे आहे.

2019 मध्ये राज्य मंत्रिमंडळात समावेश झाल्यापासून ते निर्णायक भूमिकेमुळे आणि ठाकरेंप्रती निष्ठा बाळगल्यामुळे परब अनेकदा विरोधी पक्षाच्या हल्ल्यात सापडले आहेत.अलीकडच्या काळातील काही उदाहरण सांगायची झाली तर आरे आणि कांजूर मेट्रो कारशेड, मराठा आरक्षण, सचिन वाझे या प्रकरणांवर कायद्याची बाजू घेऊन विरोधकांना अनिल परब यांनी शांत केले होते. सोबतच परब आणि सुभाष देसाई यांचा सल्ला घेऊनच उद्धव ठाकरेंनी राठोडांच्या राजीनाम्याचा निर्णय घेतल्याचं सांगितले जाते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या ३०८१ वर, १६५ रुग्ण वाढले

News Desk

‘पीक विम्याबाबत राज्य सरकारची, केंद्राला विनंती’, शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घ्या शरद पवार!

News Desk

“कुणी कुणाला जोडे मारायचे आणि कुणी कुणाला…”,फडणवीसांची त्या लेटरवर पहिली प्रतिक्रिया

News Desk