HW News Marathi
देश / विदेश

शेतकरी आंदोलनाला आलेल्या हिंसक वळणात पुढे आलेले एक नाव म्हणजे ‘दीप सिद्धू’, कोण आहे हा?

नवी दिल्ली | गेल्या २ महिन्यांपेक्षाही अधिक काळ शेतकऱ्यांचे केंद्राने लागू केलेल्या ३ कृषी कायद्यांविरोधात आंदोलन सुरु आहे. काल (२६ जानेवारी) प्रजासत्ताक दिनी या आंदोलनाला हिंसक वळण आले.प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर काल दिल्लीत शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅली काढली. मात्र, या रॅली दरम्यान हिंसा भडकल्याने संपूर्ण देशभर खळबळ उडाली आहे. दोन महिने शांततेत आंदोलन करणारे शेतकरी अचानक हिंसक कसे झाले? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. मात्र, या हिंसेला शेतकरी नव्हे तर इतर लोकच जबाबदार असल्याचं आता पुढे येऊ लागलं आहे. त्यात शेतकरी संघटनेचे प्रवक्ते राकेश टिकैत, अभिनेता दीप सिद्धू आणि गँगस्टर ते राजकारणी अशा भूमिकेत असलेल्या लक्खा सिधानाची नावंही पुढे आली आहेत.

कोण आहे दीप सिद्धू?

दीप सिद्धू याने कायद्याचं शिक्षण घेतलं आहे. किंगफिशर हंट अॅवार्ड जिंकण्यापूर्वी तो बार असोसिएशनचा सदस्य होता. २०१५मध्ये रमता जोगी हा त्याचा पहिला पंजाबी सिनेमा प्रदर्शित झाला होता. २०१८मध्ये आलेल्या जोरा दास नुम्बरिया या सिनेमाने ओळख मिळाली होती. या सिनेमात त्याने गँगस्टरची भूमिका साकारली होती. अभिनेते सनी देओल यांनी गुरुदासपूर येथून लोकसभेची निवडणूक लढवली होती. यावेळी तो निवडणूक प्रचारात दिसले होते. अभिनेता सनी देओलशी त्याचे चांगले संबंध असल्याचं बोललं जात आहे. पण सनी देओलने त्याच्याशी संबंध नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

दीप सिद्धू हा पेशानं गायक कलाकार आहे. कायद्याचं शिक्षण घेऊन देखील त्यानं सिनेविश्वात आपलं करिअर सुरू केलं. २०१५मध्ये रमता जोगी हा त्याचा पहिला सिनेमा प्रदर्शित झाला. त्यानंतर जोरा दास नम्ब्रिया या सिनेमात त्यानं साकारलेल्या गँगस्टरच्या भूमिकेला देखील विशेष लोकप्रियता मिळाली. तिथून दीप सिधूच्या करिअरला वेग मिळाला. त्याच्या याच लोकप्रियतेमुळेच २०१९च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या अभिनेता सनी देओलने त्याला आपल्या प्रचारात देखील सहभागी करून घेतलं होतं. दरम्यान, दीप सिधूचे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सनी देओल यांच्यासोबतचे फोटो नेटिझन्सकडून व्हायरल केले जात आहेत. या फोटोंमुळे आणि सनी देओलच्या प्रचारामुळे दीप सिधूचं भाजप कनेक्शन स्पष्ट होत असल्याचा दावा केला जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘ब्लॅक फंगस’चा कहर! साथीचा आजार म्हणून जाहीर, केंद्र सरकारच्या राज्यांना सुचना

News Desk

तब्बल ६० तासांच्या संघर्षानंतर विंग कमांडर अभिनंदन मायदेशी परतले

News Desk

नवे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता

News Desk