HW News Marathi
Covid-19

रामदेव बाबांना फक्त ‘धोतरावर’ कोविड सेंटरमध्ये जाऊन दाखवा म्हणणारे डॉ. लेले आहेत तरी कोण?

नवी दिल्ली | गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेले रामदेव बाबा यांची आणि इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्यामधील शाब्दिक वॉर अजूनही थांबले नाही.ॲलोपॅथी उपचारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या बाबा रामदेव आणि इंडियन मेडिकल असोसिएशनचे महासचिव डॉ. जयेश लेले यांच्यामध्ये टीव्ही डिबेटमध्ये चांगलीच खडाजंगी झाली आहे.

लेले यांनी बाबा रामदेव यांचा खरपूस समाचार घेतलेला व्हिडिओ व्हायरल झाला आहे. बाबा रामदेव यांना सडेतोड प्रत्युत्तर दिल्याने सोशल मीडियातून डॉ. लेले यांचे कौतुक होताना दिसत आहे.

वाद काय झाला?

ॲलोपॅथीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करुन गंभीर आरोप करणाऱ्या रामदेव बाबांना रविवारी सक्तीने माफी मागावी लागली. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा ॲलोपॅथी उपचार पद्धतीवरून २५ प्रश्न इंडियन मेडिकल असोसिएशनला विचारले आहेत.

डॉ. लेले कोण आहेत?

डॉ. जयेश लेले इंडियन मेडिकल असोसिएशनच्या मुख्यालयात मानद महासचिव आहेत. ते जनरल फिजीशियन असून त्यांचा मालाड पश्चिममध्ये दवाखाना आहे. डॉ. लेले इंडियन मेडिकल असोसिएशनच्या हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडियाचे राष्ट्रीय सचिव आहेत.

रामदेव बाबांकडून आयएमएला २५ प्रश्नांचा भडिमार

बाबा रामदेव यांच्या पतंजली कंपनीने आएमए आणि फार्मा कंपन्यांना २५ प्रश्नांचा लेटर बॉम्ब टाकला आहे. बाबा रामदेव यांनी लिहलेल्या पत्रात हिपेटीटीस, लिवर सोयरासीस, हृदयविकार, शुगर, लिवर, थॉयराईड, ब्लॉकेज, बायपास, मायग्रेन, पायरीया, निद्रानाश, तणाव, व्यसनाधिनता, क्रोध यासह अन्य विषयांवर बाबा रामदेव यांनी फार्मा आणि आयएमएला प्रश्नांचा भडीमार केला आहे.

बाबा रामदेव आणि आयएमए यांच्यातील वाद काही संपायचे नाव घेत नाही. बाबा रामदेव यांनी रविवारी आयएमएवर केलेले व्यक्तव्य मागे घेत खेद व्यक्त केला होता. सोमवारी पुन्हा बाबा रामदेव यांचा नवीन एक व्हिडीओ व्हायरल झाला. त्यात ते लोकांकडून योगा करून घेताना डॉक्टरांची चेष्टा करताना दिसत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

स्थलांतरित मजुरांच्या सद्यस्थितीची सर्वोच्च न्यायालयाकडून गंभीर दखल

News Desk

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचे निधन 

News Desk

पहिल्या लाटेनंतर गाफील झालो, म्हणून हे संकट उभं राहिलं – मोहन भागवत

News Desk