HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

पंढरपूर पोटनिवडणुकीच्या तोंडावर भाजपला धक्का देत राष्ट्रवादीत येणारे कल्याणराव काळे आहेत कोण?

पंढरपूर  | राज्यात पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. या निवडुकीत भाजपला २ मोठे धक्के धक्के बसले आहेत. पहिला म्हणजे भाजप उमेदवार समाधान आवताडे यांचे चुलत बंधू सिद्धेश्वर आवताडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. तर दुसरा मोठा धक्का म्हणजे भाजपचे कल्याणराव काळे हे येत्या २ दिवसांत म्हणजेच गुरुवारी (८ एप्रिल) राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या दौऱ्यात भाजपला रामराम ठोकून कल्याणराव काळे आपल्या हाती राष्ट्रवादीचे घड्याळ बांधणार आहेत.

सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांनी अजित पवारांबरोबर ठरलंय ! असा निरोपच काळेंच्या मनधरणीसाठी आलेल्या खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकरांना देण्यात आल्याने निंबाळकर माघारी परतले असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, अजित पवार यांचे खंदे समर्थक मानले जाणारे आमदार संजयमामा शिंदे आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नुकतीच एक गुप्त बैठक झाल्याची माहिती मिळते. महत्वाची बाब म्हणजे याच बैठकीत कल्याणराव काळे देखील उपस्थित होते.

कल्याणराव काळे यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी भाजप नेत्यांनी त्यांच्या अडचणीत असलेल्या कारखान्याला आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यानंतर ते आश्वासन पाळले नसल्याने कल्याणराव काळे भाजपवर नाराज होते. ते राष्ट्रवादीच्या संपर्कात होते. मात्र, अधिकृत प्रवेश केला नव्हता. गुरुवारी अखेर काळे अधिकृतपणे अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील.

कोण आहेत कल्याणराव काळे ?
  • कल्याणराव काळे हे सोलापूर जिल्ह्यातील मोठे नेते
  • विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश
  • माढा, पंढरपूर आणि सांगोला विधानसभा मतदारसंघात मोठा जनाधार
  • राजकारणाबरोबरच सामाजिक, शैक्षणिक, बँकिंग, आरोग्य क्षेत्रातही मोठं काम
  • सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्याचे अध्यक्ष
  • सिताराम महाराज साखर कारखान्याचे संस्थापक
  • श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष
  • सोलापूर जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष
  • सोलापूर जिल्हा सहकारी बँक असोसिएशनचे अध्यक्ष
  • राज्य सहकारी साखर संघाचे माजी उपाध्यक्ष

 

Related posts

जनतेची दिशाभूल करणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर विश्वास कसा ठेवायचा ? | अशोक चव्हाण

अपर्णा गोतपागर

पुण्यात १५ नवे कोरोना पॉझिटिव्ह, पुण्यात एकूण आकडा १९०

News Desk

आर्यभट्टांनी शोध लावलेल्या शुन्याचा वापर भाजपाने जास्त केला

rasika shinde