HW News Marathi
महाराष्ट्र

ज्या पुतण्यामुळे काका ट्रोल झाले तो ‘तन्मय फडणवीस’ आहे तरी कोण?

नागपूर | विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस कालपासून एका वेगळ्या गोष्टीवरुन चर्चेत आहे. याचं कारण असं की त्यांचा पुतण्या तन्मय फडणवीस याने घेतलेली कोरोना लस. केंद्र सरकारने सध्या फ्रंट लाइन वर्कर यांच्यासह ४५ वर्षांवरील नागरिकांना लस देण्याचे स्पष्ट निर्देश आहेत. आणि काल (१९एप्रिल) १८ वर्षावरील सर्वांना कोरोना लस घेण्यात येणार आहे पण तीही १ मेपासून. मग अशावेळी देवेंद्र फडणवीस यांचा पुतण्या तन्मय फडणवीस यांनी लस कशी घेतली असा प्रश्न आता सातत्याने विचारला जात आहे. त्यावरुनच देवेंद्र फडणवीस यांच्यावर विरोधकांकडून टीका केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तन्मय फडणवीस याने पहिला डोस मुंबईच्या सेवेन हिल रुग्णालयात घेतला होता. तर दुसरा डोस नागपूरच्या नॅशनल कॅन्सर सेंटरमध्ये घेतला होता. त्यामुळे आता विरोधक या सगळ्यावरुन फडणवीसांनाच घेरण्याचा प्रयत्न करत आहे. आता ज्या तन्मय फडणवीस याच्यामुळे विरोध पक्ष नेते देवेंद्र फडणवीस अडचणीक आले आहेत तो तन्मय फडणवीस नेमका आहे तरी कोण?

माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा चुलत पुतण्या आहे तन्मय फडणवीस. माजी मंत्री शोभा फडणवीस यांचा तो नातू आहे. मिळालेल्या माहितीनुसार तन्मय हा एक इंजिनिअर असून तो काही दिवस मुंबई तर काही दिवस नागपुरात वास्तव्यास असून सोशल मीडियावर तो खूपच एक्टिव्ह असल्याचं दिसून आलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आता धारावीतील प्रत्येक नागरिकाची होणार कोरोना टेस्ट

News Desk

रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याने प्रत्येकी ७५ कोटींचे प्रस्ताव तातडीने द्यावेत – अजित पवार

News Desk

तीन पक्षांच्या सरकारवर टीका करणाऱ्यांना रोहित पवारांनी थेट रिक्षाच चालवून दाखवली

News Desk