HW News Marathi
महाराष्ट्र

“उद्धव ठाकरे आणि शरद पवार गप्प का आहेत ?” चंद्रकांत पाटलांचा संतप्त सवाल 

मुंबई | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे राज्यातील राजकारण मोठ्या प्रमाणात तापले आहे. या प्रकरणात शिवसेना नेते आणि राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचे नाव समोर येत असल्याने विरोधी पक्षाने सुरुवातीपासूनच अत्यंत आक्रमक भूमिका घेऊन या प्रकरणी सरकारची कोंडी केली आहे. दरम्यान याच पार्श्वभूमीवर, आज (२३ फेब्रुवारी) तब्बल १५ दिवसांनंतर मंत्री संजय राठोड माध्यमांसमोर आले आहेत. आपल्याविरुद्ध घाणेरडे राजकारण झाल्याचा दावा यावेळी संजय राठोड यांनी म्हटले आहे आणि भाजप पुन्हा एकदा आक्रमक झाले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी याप्रकरणी संतप्त सवाल उपस्थित करत प्रतिक्रिया दिली आहे.

“उद्धव ठाकरे आणि शरद पवार गप्प का आहेत ?” चंद्रकांत पाटलांचा संतप्त सवाल

“आत्महत्याग्रस्त तरुणीचे फोटो संबंधित मंत्र्यासोबत प्रसिद्ध होऊनही त्याच्यावर कोणतीही कारवाई का होत नाही ?”, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे.

“तरुणीच्या आत्महत्येचा आरोप असेलेले व लपून बसेलले राज्य सरकार मधील एक मंत्री आज 15 दिवसानंतर वाजतगाजत प्रकट होत आहेत. माध्यमांमध्ये दाखवत आहेत की की कसे त्या मंत्र्यांचे समर्थक जल्लोष करत गाड्यांमधून मिरवणूक काढत आहेत. आज एका वृत वाहिनीवर त्या मंत्र्यांचे आत्महत्याग्रस्त तरुणी सोबतचे फोटो प्रसिद्ध होऊनही राज्य सरकारने अजूनही ढिम्मपणे बघ्याची भूमिका घेतली आहे”, अशी संतप्त प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

“एवढे पुरावे समोर येऊनही अजून काय सिद्ध होण्याचे बाकी आहे ? राज्य सरकार त्या प्रकरणावर कोणताही गुन्हा नोंदवून घेण्यास का तयार नाही आहे ? सत्तेचा गैरवापर करून कायदा खिशात घालण्याची परिसीमा या ठाकरे सरकारने ओलांडली आहे. आज जेव्हा या सर्व घडामोडी महाराष्ट्राच्या जनतेसमोर येत आहेत तेव्हा उद्धव ठाकरे आणि शरद पवार गप्प का आहेत ?”, असा सवालही चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

त्याचप्रमाणे, “तुम्ही तर महाराष्ट्राच्या अस्मितेचे संरक्षण केले पाहिजे पण उलट तुम्ही तर एका आरोपीला वाचवत आहात”, असा आरोप करत चंद्रकांत पाटील यांनी यावेळी “आत्महत्याग्रस्त तरुणीला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे”, अशी मागणी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सेना-भाजपमध्ये युतीचा तिढा अखेर सुटला ?

News Desk

टरबुजाचे भाव घसरल्याने शेतकऱ्याचाही घसरला पारा ; टरबुज उखडून फेकले

News Desk

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या समृद्धी महामार्ग लोकार्पण सोहळ्याचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

Aprna