मुंबई | “‘मुका घ्या मुका’ प्रकरणामध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना का अटक करत आहात?”, असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्य सरकारवर केला आहे. शीतल म्हात्रे आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणी (Sheetal Mhatre offensive video case) पोलिसांनी माजी मंत्री आणि युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचे निकटवर्तीय निकटवर्तीय आणि युवासेना सोशल मीडियाची जबाबदारी असलेले साईनाथ दुर्गे यांनी अटक केले असून साईनाथ दुर्गे यांच्यासह मातोश्री फेसबुक पेज चालवणारे विनायक डावरे अटक केले आहे. या प्रकरणामुळे राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. या प्रकरणावरून तो व्हिडिओ संबंधित आमदाराच्या मुलाने शेअर केल्या सगळीकडे त्याला अटक केली का?, अटक केली नाही, असे अनेक प्रश्न संजय राऊत यांनी आज (15 मार्च) माध्यमांशी बोलताना राज्य सरकारला केली आहे.
संजय राऊत म्हणाले, “आता ही मुंबईमध्ये जे काही व्हिडिओचे प्रकरण सुरू आहे. मुका घ्या, मुका हा सिनेमा सुरू चालू आहे. दादा कोंडके आज असायला हवे होते तर त्यांना हा मुका घ्या, मुका हा एक सिनेमा करायला सांगा. ‘मुका घ्या मुका’ प्रकरणामध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना का अटक करत आहात? शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा संबंध काय आहे. हा सत्तेचा गैरवापर आहे. पोलीस यंत्रणेचा गैरवापर आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा संबंध काय?, तुम्ही त्यांना अटक करताय. तुम्ही त्यांच्यावर अशी कलमे लावत आहेत की ते सुटणार नाही. आम्ही सांगतले का मुका घ्यायला. जाहीर सर्वजनिका कार्यक्रमात मुळात तो व्हिडिओ खरा की, खोटा हे आधी समोर येऊ द्या. मग मॉफचा विषय नंतर येईल. मी तो व्हिडिओ पाहिलेला नाही. पण, सांगतो, मला असंख्य कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांचे फोन येत आहेत की, आज आमच्या घरात फोन आले. आज आमच्या कार्यलयात पोलीस आलेत. हा काय प्रकार चालू आहे. मुळात तो व्हिडिओ संबंधित आमदाराच्या मुलाने शेअर केल्या सगळीकडे त्याला अटक केली का?, नाही अटक केली. तुम्ही कोणाची बदनामी करताय. हे तुमच्या पक्षातील, हे तुमच्या गटारातील अंतर्गत जी काही भांडणे असतील. तर ती तुम्ही मिटवा. शिवसेनेला लक्ष करू नका.”
…मग शाहिस्तेखान खानाची बोटे तुटली हे लक्ष्यात ठेवा
या प्रकरणात सुर्वे अद्याप समोर आलेले नाही, असा प्रश्न पत्रकारांनी संजय राऊतांना केल्यावर ते म्हणाले, “याला पाहिजे, जे काही तुमच्याकडून समजते. यांच्या अर्थ पहिले गुन्हेगार ते आहेत. मुका घेणारे दादा कोंडकेंनी त्यांच्यावर सिनेमाच काढला असता. दादांचा सिनेमा होता, मुका घ्या मुका, पहा तुम्ही नव्या हा सिनेमा शिंदे गट सुरू करतील तर हा त्यांचा प्रश्न आहे. तुम्ही काही करा, तुम्ही मुके घ्या किंवा मिठ्ठ्य मारा. हा तुमचा प्रश्न आहे. सार्वजनिक ठिकाणी तुम्ही जर आश्लील वर्तन करत असाल आणि त्यावर कोणाचा आक्षेप असेल. तर पहिला गुन्हा हा आक्षेप वर्तन करणाऱ्यावर केला पाहिजे. तुम्ही आमच्या लोकांना अटका करताय. तुम्ही आमच्या लोकांना धमकी देत आहात. रात्री अपरात्र तुम्ही आमच्या शिवसैनिकांच्या घराचे दरवाजे ठोठावत आहात. तुम्ही त्यांच्या पालकांना आणि बालकांना धमकी देत आहात. ही काय मुघलाई चालू आहे का?, तुम्ही मुके घेतले, तुम्ही निसतरा. आमच्यावरती बोट दाखवू नका. मग शाहिस्तेखान खानाची बोटे तुटली हे लक्ष्यात ठेवा.”
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.