HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यापाल भेटवर अजित पवारांचा विनोत तावडेंना टोला

मुंबई। काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या भेटीपूर्वीच भाजप नेते विनोद तावडे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी त्यांच्या खास शैलीत त्यांची खिल्ली उडवली. अजित पवार म्हणाले की, “सरकार स्थापनेबाबत चर्चा करण्यासाठी नव्हे तर, आपले तिकीट का कापले असावे, याची विचारणा तावडेंनी राज्यपालांकडे केली असावी,” असा टोला त्यांनी लगावला आहे.

एकीकडे महायुतीला बहुमत मिळाल्यानंतरही राज्यात निर्माण झालेला सत्तास्थापनेचा तिढा आणि दुसरीकडे अवकाळी पाऊस आणि वादळ या अस्मानी संकटांमुळे राज्यातील शेतीचे झालेले मोठे नुकसान या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या नेत्यांनी काल (५ नोव्हेंबर) राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. मात्र, आघाडीचे नेते राज्यपालांना भेटण्यापूर्वी विनोद तावडे यांनी राज्यपालांची भेट घेतली होती.

नेमके काय म्हणाले अजित पवार

राज्यात सत्तास्थापनेबाबत तावडेंनी राज्यपालांची भेट घेतली असावी, अशी चर्चा सुरू होती. त्यावरून विचारणा केली असता अजित पवार यांनी विनोद तावडे यांना टोला लगावला. ”माझ्या माहितीप्रमाणे विनोद तावडे हे सध्याच्या विधानसभेचे सदस्यसुद्धा नाहीत. ते आपल्या नेत्याला मतसुद्धा देऊ शकत नाही. ते इथे येऊन काय चर्चा करणार आहेत. नेते म्हणून चंद्रकांत पाटील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे किंवा एकनाथ शिंदे आले असते, त्यांनी चर्चा केली असती तर मी समजू शकलो असतो. राज्यपाल महोदय तुम्ही आधी भाजपामध्ये होता. माझं तिकीट काहो कापलं असेल हे विचारायला कदाचित तावडे आले असतील,”असा चिमटा अजित पवार यांनी काढला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईत मालाडमध्ये रहिवासी इमारत कोसळून ११ जणांचा मृत्यू, ७ जखमी

News Desk

गोपीनाथ गडावर पंकजांचा पराभव

News Desk

आषाढी यात्रेसाठी उद्यापासून पालख्यांचं प्रस्थान, भाजप अजूनही पायी वारीवर ठाम

News Desk