मुंबई | राष्ट्रवादीचे नेते आणि उद्धव ठाकरे सरकारमधील सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी आणखी वाढणार असं चित्र दिसत आहे. धनंजय मुंडे यांनी ज्यांच्याशी सहसहमतीने आपले संबंध होते असं कबूल केल त्या करुणा धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे धनंजय मुंडेंची तक्रार केली आहे. फेसबुकवर व्हिडीओ पोस्ट करून त्यांनी धनंजय मुंडेंची संपत्तीच मांडली आहे. तसेच मुंबईत आमदारांसाठी जी इमारत बांधली जात आहे, ती बांधू नये, असे म्हटले आहे. इतकंच नाही तर सामान्य नागरिकांना किती त्रास सहन करावा लागत आहे याची खंतही त्यांनी व्यक्त केली आहे.
काय म्हणाल्या करुणा मुंडे?
“धनंजय मुंडे मंत्री आहेत. जेव्हा माझे पती विधानपरिषद आमदार होते तेव्हा परळीमध्ये तीन बंगले, एक फार्म हाऊस, पुण्यात दोन मोठमोठे बंगले आणि मुंबई आमचे दोन मोठमोठे फ्लॅट आहेत.एक नरीमन पॉईंटला एक सांताक्रूझला. त्यानंतरही आम्हाला सरकारी बंगला मिळाला आहे. ते जेव्हा आमदार होते तेव्हाचे हे सारे मिळवले होते. यामुळे मी सरकारला विनंती करते की, आमदार निवासासाठी 900 कोटी रुपये खर्च का करावेत? पोलिसांच्या वस्त्या नवीन बनवा, दुरुस्त करा”.
“जी इमारत आमदार निवासासाठी उभारली जात आहे त्यावर एवढे पैसे खर्च करण्याची गरज काय गरज आहे? हा पैसा सामान्यांसाठी वापरा असे आवाहन त्यांनी केले आहे. सामान्य लोकांना सुवीधा दिल्या जात नसल्याची तक्रार करूणा मुंडे यांनी केली आहे.मालाडमध्ये बांधलेल्या २० बाथरुमचे टाळे खोला, महानगरपालिकेच्या निवडणुकांची वाट पाहिली जातेय”, असा आरोप केला आहे.
मुंबईत काही ठिकाणी बोटीतून पाणी आणावे लागत आहे. झोपडपट्टी भागात असुविधा आहेत. आमदार निवासावरील पैसा त्यावर खर्च करा असे आवाहन त्यांनी केले आहे. दोन दिवसांपूर्वी करुणा मुंडे यांनी राज्यपालांना देखील तिच्यावर झालेल्या अन्यायाबाबत आणि धनंजय मुंडेकडून जिवाला धोका असल्याबाबत पत्र लिहिले आहे.त्यामुळे आता करूणा मुंडेंच्या या व्हिडीओबाबत धनंजय मुंडेंची काय प्रतिक्रिया येते आणि सरकार काही दखल घेते का हे पाहाव लागणार आहे.
@dhananjay_munde @PMOIndia @supriya_sule @Dev_Fadnavis @TimesNow pic.twitter.com/VKXMbsjXmt
— karuna dhananjay munde (@munde_karuna) May 18, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.