HW News Marathi
महाराष्ट्र

आर्यन खानला मिळणार का जामीन? आज जामीन अर्जावर हायकोर्टात होणार सुनावणी


मुंबई। मुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी अटकेत असलेला शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या जामीन अर्जावर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. तसेच आर्यनसोबत अटक असलेली मुनमून धमेचाच्या जामीन अर्जावर देखील आज सुनावणी होणार आहे. बुधवारी मुंबईच्या विशेष न्यायालयात क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात आर्यन खानसह आणखीन अरबाज मर्चंट आणि मुनमून धमेचा यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता. त्यानंतर जामीन देण्यास नकार दिल्याच्या एनडीपीएस न्यायालयाच्या आदेशाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात आर्यनच्या वकिलांनी धाव घेतली.आर्यनचे वकील सतीश मानेशिंदे म्हणाले की, ‘उच्च न्यायालयाने २१ ऑक्टोबरला आर्यन खानच्या जामीन अर्जावर २६ ऑक्टोबर रोजी सुनावणी होईल असे स्पष्ट केले.’ यावेळेस उच्च न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे सुनावणी घेण्याची विनंती आर्यनच्या वकिलांकडून करण्यात आली. मात्र न्यायालयात नकार दिला.

पुन्हा अनन्याला चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स

यादरम्यान आर्यन खानच्या व्हॉट्सअॅप चॅटमधून बॉलिवूड नवोदित अभिनेत्री अनन्या पांडेचं नाव समोर आले. गुरुवार, शुक्रवार सलग दोन दिवस अनन्याची चौकशी एनसीबीने केली. मात्र काल, सोमवारी पुन्हा अनन्याला चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स बजावला होता. मात्र वैयक्तिक कारणास्तव अनन्या एनसीबी चौकशीसाठी हजर राहिली नाही. माहितीनुसार क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात अटकेत असलेल्या आर्यन खानसोबत दोन वर्षांपूर्वीच्या व्हॉट्सअॅप चॅटमध्ये ड्रग्जचा उल्लेख झाल्यामुळे अनन्याला एनसीबी कार्यालयाच्या पायऱ्या चढाव्या लागल्या.

वानखेडे यांना दिल्लीत ताबडतोब बोलवण्यात आले

पण आर्यन खानच्या या प्रकरणाला वेगळे वळण आले आहे. याप्रकरणातील एनसीबीचा मंच प्रभाकर साईल फुटल्यामुळे एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी दिल्लीतील एनसीबीचे तीन अधिकारी मुंबईत येणार असून वानखेडे यांना दिल्लीत ताबडतोब बोलवण्यात आले आहे. त्यानुसार वानखेडे काल रात्री दिल्लीत दाखल झाले आहेत. मात्र आज आर्यन खानला जामीन मिळणार की नाही? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एकीकडे भाजप-मनसे युतीला नकार, तर दुसरीकडे भाजपचे आमदार मनसे कार्यालयात!

News Desk

राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत चिपळूण दौऱ्यावर असतांना महत्वपूर्ण घोषणा…!

News Desk

कोरेगाव भीमा घटनेमागे संभाजी ब्रिगेडचा हात

News Desk