मुंबई | भाजप प्रदेशाध्यक्ष पदी चंद्रकांत पाटील तर मुंबई अध्यक्ष पदी मंगल प्रभात लोढा यांची पदनियुक्ती करण्यात आली. येणाऱ्या विधानसभेसाठी महाराष्ट्राची जबाबदारी चंद्रकांत पाटील तर मुंबईची जबाबदारी लोढा यांच्या खांद्यावर असणार आहे. राज्यात आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजपने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. तसंच मुंबईतील ३६ जागा जिंकू असा विश्वास देखील लोढा यांनी व्यक्त केला आहे.
अनेक दिवसांपासून या विधानसभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन जागांवर निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र ही माहिती खोटी असून मुख्यमंत्री फडणवीस फक्त नागपूरमधूनच निवडणूक लढणार असल्याचे भाजपच्या मंत्र्यांने सांगितले आहे. देवेंद्र फडणवीस हे मुंबईतील मलबार हिल किंवा मुलुंडमधून निवडणूक लढवणार अशी अफवा होती. त्यातील मलबार हिलचा पर्याय आघाडीवर होता. हा भाग भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना या जागेवरून उतरवण्यात येईल अशी चर्चा होती. मुख्यमंत्री फडणवीस केवळ नागपूर मधून लढणार असल्याच सांगितले जात आहे.
एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत भाजपच्या एका मंत्र्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, मुख्यमंत्री फक्त नागपूरमधूनच निवडणूक लढवणार आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.