HW News Marathi
Covid-19

उद्धव ठाकरेंच्या विधानपरिषदेवरील नियुक्तीचा विचार करणार !

मुंबई | राज्यात एकीकडे कोरोनाचे संकट उभे थकलेले असताना दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबतचा पेच निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर, महाविकासाआघाडीच्या नेत्यांनी आज (२८ एप्रिल) राजभवन येथे राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांच्यापुढे दुसऱ्यांदा उद्धव ठाकरेंच्या विधान परिषदेवरील नियुक्तीबाबतचा प्रस्ताव ठेवला. दरम्यान, यावेळी राज्यपाल कोश्यारी यांनी उद्धव ठाकरेंच्या नियुक्तीबाबत विचार करण्याचे आश्वासन दिल्याची माहीती मिळत आहे. दरम्यान, यापूर्वी देखील राज्याच्या मंत्रिमंडळाने राज्यपालांकडे याबाबतचा प्रस्ताव ठेवला होता. त्यावेळी राज्यपालांकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नव्हता. आता मात्र राज्यपालांकडून विचार करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

कोलकाता उच्च न्यायालयातील ज्येष्ठ न्यायाधीश न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी आज (२८ एप्रिल) मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी न्या. दीपांकर दत्ता यांना पदाची शपथ दिली. राजभवन येथे पार पडलेल्या या छोटेखानी समारंभात मुख्यमंत्र्यांसह राज्याचे पक्षीय महत्त्वाचे नेते उपस्थित होते. या समारंभानंतर महाविकासआघाडीच्या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली. उद्धव ठाकरेंच्या विधान परिषदेवरील नियुक्तीबाबतच्या प्रस्तावाचा पुनरुच्चार यावेळी करण्यात आला. विचार करू, असे आश्वासन दिल्यानंतर आता राज्यपाल नेमका काय निर्णय घेणार आणि उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाचा पेच सुटणार का ? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

घरात नाही दाणा, पण मला ‘व्हॅक्सिन गुरू’ म्हणा, रुपाली चाकणकरांनी केंद्राला डिवचलं

News Desk

शाळा सुरू करण्यासंदर्भात मुख्यमंत्री टास्क फोर्सशी चर्चा करणार, राजेश टोपेंची माहिती!

News Desk

प्रकाश जावडेकर यांनी मास्क घालण्याबाबत सांगितलं की…!

News Desk