HW News Marathi
महाराष्ट्र

विखेंना घेतले परंतु छगन भुजबळ यांना पक्षात घेणार नाही !

मुंबई | “विधानसभेच्या तोंडावर विरोधी पक्षातील अनेकांना भाजपमध्ये यायचे आहे. अन्य पक्षातून भाजपमध्ये येणाऱ्यांची संख्या जरी जास्त असली तरीही आमचा पक्ष ‘आओ जाओ घर तुम्हारा’ नाही. आम्ही अगदी पारखून मोजक्याच जणांना आमच्या पक्षात घेत आहोत. उदाहरण द्यायचे झाले तर आम्ही राधाकृष्ण विखे पाटील यांना पक्षात घेतले. कारण, राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर कोणतेही आरोप नाहीत. मात्र, छगन भुजबळ यांना घेणार नाही”, असे विधान भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

“भाजपमध्ये येऊन राधाकृष्ण विखे-पाटील मंत्री झाले आहेत. सुजय विखे-पाटील खासदार झाले आहेत. त्यामुळे आता तिथल्या जिल्ह्यांची चिंता नाही. आता आम्हाला ‘काँग्रेससंस्कृती मुक्त महाराष्ट्र’ करायचा आहे”, असेही चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले. “गेल्या ५ वर्षांत आमच्या मंत्रिमंडळात केवळ निष्ठावंतांनाच संधी देण्यात आली आहे. आम्ही राधाकृष्ण विखे पाटील यांना केवळ त्यांच्या स्वच्छ प्रतिमेमुळे मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे”, असेही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्लास्टिकचा वापर टाळूया आणि पर्यावरण रक्षणाचा संकल्प करूया! – मुख्यमंत्री

Aprna

मराठा समाज आरक्षणासाठी कटिबद्ध, पूर्ण ताकदीने न्यायालयीन लढा लढणार! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Aprna

३७६ एसटी कर्मचार्‍यांचे निलंबन राज्य सरकारची कारवाई

News Desk