HW News Marathi
महाराष्ट्र

ST कर्मचाऱ्यांच्या संपावर आज तोडगा निघणार? अंतरिम वेतनवाढीच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब होणार?

मुंबई। गेल्या महिनाभरापासून एसटी कर्मचारी हे राज्यात विलीनीकरणाच्या मागणीसाठी संपावर गेले आहे. या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांसाठी आजचा (२४ नोव्हेंबर) सकाळी ११ वाजता महत्त्वाची बैठकी असणार आहे. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना अंतरिम वेतनवाढचा प्रस्ताववर चर्चा होणार आहे. या बैठकीनंतर एसटी कर्मचारी त्यांचा संप मागे घेणार का? की विलीनीकरण करणार ठाम राहणार, हे बैठकीनंतर कळेल. परंतु, या बैठकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

अनिल परबांनी काल (२४ नोव्हेंबर) सह्याद्री अतिथीगृह एसटी कर्मचाऱ्यांशी चर्चा बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत परबांनी भाजप नेते गोपीनाथ पडळकर, आमदार सदाभाऊ खोत आणि एसटी कर्मचाऱ्याचे शिष्टमंडळ यांच्यासोबत जवळपास दोन तास चर्चा झाली. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती प्रसार माध्यमातून मिळाली आहे.

विलीनीकरण करणारा मुद्दा कोर्टात

पडळकर, खोत आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळातील सदस्यांशी चर्चा झाल्या परब म्हणाले, “एसटी विलीनीकरण करणारा मुद्दा हा कोर्टात आहे. यामुळे सरकार यावर निर्णय घेऊ शकत नाही. कोर्टाकडून नेमलेल्या समितीने १२ आठवड्यात आपला अहवाल द्यायचा आहे. समितीचा जो काही अहवाल असेल तो राज्य सरकारला मान्य असेल,” असे परब म्हटले. एसटी कर्मचाऱ्यांनी त्यांचा संप थांबवण्यासाठी

सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना अंतरिम पगारवाढीचा प्रस्ताव दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एकनाथ शिंदे, आदित्य ठाकरे यांच्यासह अन्य शिवसेना नेते राजभवनात दाखल

News Desk

‘साजिशें लाखो बनती है मेरी हस्ती मिटाने के लिये’ छगन भुजबळांची निर्दोष मुक्तते नंतर पहिली प्रतिक्रिया

News Desk

शिवसेनेच्या प्रस्तावासाठी भाजपची दारे २४ तास खुली !

News Desk