HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

केंद्र सरकार राज्यातील शेतकऱ्यांसाठी काही करणार आहे का ?

नवी दिल्ली | “केंद्र सरकार राज्यातील शेतीव्यवसाय आणि शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी काही करणार आहे का ?”, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार ट्विटवरच्या माध्यमातून सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे. “खरंतर शेती हा राज्याच्या अंतर्गत येणार मुद्दा आहे. मात्र, केंद्रीय कृषी मंत्र्यांनी असे सांगितले होते कि पाणी आणि बियाणांच्या प्रश्नावर सरकार विशेष लक्ष देत आहे. म्हणून मी त्यांना प्रश्न विचारत आहे”, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या. सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर करत हा प्रश्न उपस्थित केला आहे.

राज्यातील भीषण दुष्काळस्थिती आणि शेतकऱ्यांचे गंभीर प्रश्न या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी हे प्रश्न उपस्थित केले आहेत. “मी ज्या राज्याचे प्रतिनिधित्व करते त्या महाराष्ट्रात भीषण दुष्काळस्थिती आहे. राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे, शेती व्यवसाय अडचणीत आहे. राज्यात दररोज सरासरी ८ शेतकरी आत्महत्या करत आहेत. जर राज्यात इतकी भीषण स्थिती निर्माण झाली असेल तर केंद्र सरकारकडून शेती आणि शेतकऱ्यांसाठी काही ठोस निर्णय घेण्यात येणार आहेत कि नाही ?”, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

Related posts

#MarathaReservation : आरक्षणाआधीच भाजपला श्रेय लाटण्याची घाई

News Desk

कर्जमाफी प्रकियेतील आधार कार्डचा घोळ

News Desk

सर्वोच्च न्यायालयाने शबरीमाला प्रकरणी पुर्नविचार याचिका राखून ठेवली

News Desk