HW News Marathi
महाराष्ट्र

“पाठीत खंजीर खुपसणाऱ्या शिवसेनेला धडा शिकवण्यासाठी मुंबई महापालिका जिंका” – चंद्रकांत पाटील

मुंबई। भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे सातत्याने महाविकास आघाडी सरकारवर, विशेषता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर वारंवार टीका करताना दिसतात. आज पुन्हा एकदा शिवसेनेवर चंद्रकांत पाटील यांनी निशाणा साधला. तसेच, यावेळी त्यांनी शिवसेना खासदार अरविंद सावंत यांना जाहीर आव्हान देखील दिलं. भाजपा पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, “पोपटाचा प्राण सत्तेमध्ये आहे!; पाठीत खंजीर खुपसणाऱ्या शिवसेनेला धडा शिकविण्यासाठी मुंबई महानगरपालिका जिंका आणि महाराष्ट्रात एकहाती सत्ता आणा, हेच एकमेव उत्तर आहे.” तसेच, अरविंद सावंत यांनी भाजपाची मदत न घेता मुंबईत खासदार होऊन दाखवावं, असं जाहीर आव्हान देखील त्यांनी यावेळी दिलं. याचबरोबर, यापुढे भाजपा आपल्यासोबत प्रामाणिकपणे राहिलेल्यांच्या आधारे व संघटन वाढवून सरकार आणेल. असं देखील यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले.

आम्ही आमच्या जीवावर सरकार आणू

यावेळी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, “यापुढे भाजपा आपल्या बरोबर प्रामाणिकपणे राहिलेल्या, आरपीआय, महादेव जानकरांचा राष्ट्रीय समाज पक्ष, सदाभाऊ खोत यांच रयत क्रांती संघटना, विनायकराव मेटे यांची शिवसंग्राम, विनय कोरे यांची जनसुराज्य या पक्षांच्या आधारे आणि संघटन वाढवून आम्ही आमच्या जीवावर सरकार आणू. मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरातमध्ये आम्हाला कोणता पक्ष लागत नाही. त्यामुळे यापुढे विश्वासघात पुरे. काय होतं यांचं विदर्भात, काय अस्तित्व होतं शिवसेनेचं मराठवाड्यात? प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, भाऊसाहेब फुंडकर यांनी हाताला धरून आणलं. जागांचं वाटप केलं, जागा विजयी केल्या.

रोज एकतरी युनिटंचं निवेदन सरकारला गेलं पाहिजे

“भाजपाने केंद्रात व राज्यात काय केलं आहे हे लोकांपर्यंत पोहचवलं पाहिजे. ते काय करत नाहीत, हे लोकांना सांगितलं पाहिजे. जे करत नाहीत त्यासंबंधी आंदोलनं केली, रोज एकतरी युनिटंचं निवेदन सरकारला गेलं पाहिजे. वर्तमानपत्रात प्रसिद्धी झाली पाहिजे. दर आठवडाभराने धऱणं आंदोलन केलं पाहिजे. उपोषण, साखळी उपोषण केलं पाहिजे. घेराव घाला, या सरकारला सळो की पळो करून सोडा.” असं देखील यावेळी चंद्रकांत पाटील यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांना सांगितले.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कसारा घाटातील पुलावर गोरखपूर एक्सप्रेसचा डबा घसरला

News Desk

सुट्टी सिगारेट विकण्यावर राज्य सरकारची बंदी

News Desk

परमबीर सिंग यांच्या संकटात भर, दोन कोटी स्वीकारल्यामुळे गुन्हा दाखल

News Desk