HW News Marathi
महाराष्ट्र

कंगनाला मिळालेलं राष्ट्रीय पुरस्कार परत घ्या – संजय राऊत

मुंबई। कायम वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत राहणारी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्यावरून चर्चेत आली आहे. यावेळी तिने भारताच्या स्वातंत्र्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्य वरून देशासाठी शहीद झालेल्या शेकडो स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाचा अपमान केला आहे. कंगनाच्या विरोधात राजकीय पक्ष देखील आक्रमक झाले आहेत. आणि या बरोबरच आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजप आणि कंगनाने केलेल्या वक्तव्यावर चांगलीच टीका केलीये. या वक्तव्याचा मी धिक्कार करतो आणि या बरोबरच कंगनाला आजपर्यंत जे जे राष्ट्रीय पुरस्कार मिळाले असतील ते परत घ्या अशी मागणी संजय राऊत यांनी आजच्या पत्रकार परिषदेमध्ये केली आहे.

ताम्रपट काय भिकाऱ्यांना दिलं का?

गेल्या 75 वर्षात स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेल्या स्वातंत्र्य सैनिकांना भारतरत्न असेल, पद्मश्री, पद्ममभूषण या सन्मानाने सन्मानित केलं आहे. आणि त्या प्रकारचा सन्मान दोन दिवसांपूर्वी कंगनाला देखील दिला हा समस्त स्वातंत्र्यवीर यांचा अपमान आहे. याबरोबरच अनेक स्वातंत्र्यवीरांना त्यांचा सन्मान म्हणून ताम्रपट देखील मिळालं आहे. मग हे ताम्रपट काय भिकाऱ्यांना दिलं का? असा सवाल देखील संजय राऊत यांनी आजच्या पत्रकार परिषदेमधून विचारला आहे. याबरोबरच भाजपला या सगळ्या वरती भूमिका स्पष्ट करावी लागेल आणि ही संपूर्ण भारताची मागणी निखिल संजय राऊत म्हणाले.

पुरस्कार मिळाले ते परत घेतले पाहिजेत

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याचा अधिकार या केंद्र सरकारला राहिलेला नाही कारण कंगनाला आजपर्यंत जे जे राष्ट्रीय पुरस्कार मिळाले ते परत घेतले पाहिजेत अशी मागणी देखील यावेळी राऊत यांनी केली. यापुढे संजय राऊत असंही म्हणाले कंगनाबेन ला काही लाज लज्जा तिने माफी तरी मागावी मला तर वृत्तवाहिनीच हे देखील आश्चर्य वाटतं देशाबद्दल असे वक्तव्य करते आणि ते या सगळ्याबद्दल टाळ्या वाजवून दाद देतात अतिशय निर्लज्जपणाचा कळस आहे असा संताप देखील व्यक्त करण्यात आला.

त्यांच्या अंगलट आल्याशिवाय राहणार

महाविकास आघाडीतील मंत्र्यांना त्यांच्या नातेवाईकांना जो त्रास द्यायचा प्रयत्न सुरू आहे त्याला मी घाबरत नाही सगळ्यांना अंगावर घ्यायला तयार आहोत असे देखील राऊत म्हणाले. भाजपचा प्रकारे तपास यंत्रणांचा वापर करत आहे याबद्दल देखील या पत्रकार परिषदेत नाराजी व्यक्त करण्यात आली. याबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रवक्ते नवाब मलिक यांचं कौतुक राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील केलं आणि राज्यातील संपूर्ण जनता मालिकांच्या पाठीशी असल्याचं वक्तव्य राऊतांनी केल. हा जो कळस आणि नीचपणाचाकपट जे काही राजकीय पक्ष करतात, तो त्यांच्या अंगलट आल्याशिवाय राहणार नाही.

याबरोबरच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येत्या दोन-तीन दिवसात कामावर रुजू होतील मात्र काल पर्यंत रुग्णालयातून ते काम पाहत होते.

केंद्रीय तपास यंत्रणांनी कपट कारस्थानाचे मोहरे बनू नये

जी तलवार चालवतात ती तलवारीच्या घावणेच मरतात, मात्र तलवारीची मूठ एक दिवस आमच्याकडे देखील येईल तुम्ही किती कपटकारस्थान करताय ते दिवस तुमच्यावरच उलटेल असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपवर चांगलीच टीका केली. केंद्रीय तपास यंत्रणांनी कपट कारस्थानाचे मोहरे बनू नयेत असा सल्ला देखील देण्यात आला. याबरोबरच भाजपचे जेपी नड्डा यांनी केलेल्या वक्तव्यावर देखील संजय राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला, डॉक्टर नड्डा यांच्याकडे आम्ही नेहमी सुसंस्कृत आणि संयमी नेतृत्व म्हणून पाहतो. जेपी नड्डा यांच्या कानात महाराष्ट्रातील काही कपटी कारस्थानी लोकांनी काही सांगितलं असेल तर त्या कर्णपिसांच्या नादाला लागू नये असा सल्ला राऊत यांनी दिला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘मला आंदोलनाची सवय नव्हती पण…’ प्रितम मुंडे याचं वक्तव्य!

News Desk

अशोक चव्हाणांनी विलासराव देशमुखांचा ‘तो’ व्हिडिओ केला ट्विट!

News Desk

आजपासून 9 मेपर्यंत औरंगबादमध्ये जमावबंदी लागू, पोलिसांचे आदेश

Aprna