HW News Marathi
महाराष्ट्र

अनिल देशमुखांच्या विरोधात पुरावा नसताना गुन्हा दाखल

मुंबई | राज्याचं राजकरण सध्या अनेक दिवसांपासून अनेक विषयांमुळे तापलं आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात सीबीआयने दाखल केलेल्या भ्रष्टाचाराच्या संबंधित एफआयआरमुळे राज्यातील संपूर्ण पोलिस दल नाखूष झाले आहे. कोणताही पुरावा नसताना सीबीआयने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे, असा दावा देशमुख यांच्या वतीने करण्यात आला.

सीबीआयने अनिल देशमुख यांच्यावर प्राथमिक चौकशी करून गुन्हा नोंदविला. पण त्यांच्याबाबत कोणताही पुरावा नाही, त्यामुळे या सर्व प्रकरणात देशमुख यांची सार्वजनिकरित्या मानहानी झाली, असे देशमुख यांचे वकील ॲड. अमित देसाई म्हणाले. न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. एन. जे. जमादार यांच्या खंडपीठापुढे देशमुख यांनी केलेल्या याचिकेवर सुनावणी झाली.

पोलिस अधिकारी परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्यावर आरोप केले. मात्र देशमुख यांच्याविरोधात एकानेही पैसे घेतल्याची फिर्याद केलेली नाही, असे त्यांनी सांगितले. याउलट या पत्रातून असे वाटत आहे की, पोलीस आयुक्तालय परिसरातच यावर संशय व्यक्त होत आहे, असा उलट आरोप त्यांनी केला.

सीबीआय एफआयआर रद्द करण्याची मागणी देशमुख यांनी याचिकेत केली आहे. तसेच सीबीआय राजकीय कारणांमुळे आरोप करीत आहे, असाही आरोप केला आहे. या चौकशी करण्याला आमचा विरोध नाही, मात्र त्यांनी देशमुख यांची बाजू ऐकून घेतली नाही, असा युक्तिवाद देसाई यांनी केला होता. याचिकेवर पुढील सुनावणी २ जुलैला होणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रवादीला गळती, मुलाखतीला ‘या’ आमदारांनी पाठ फिरवली

News Desk

मुख्यमंत्र्यांनी हातात मिस्टर इंडियाचे घड्याळ घातले!

Aprna

‘गोसीखुर्द’च्या पाण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचे निर्देश

Aprna