HW News Marathi
देश / विदेश

‘चक दे इंडिया’ म्हणत भारतीय महिला हॉकी संघ उपांत्यफेरीत दाखल!

टोक्यो | भारत टोक्यो ऑलिम्पिक मध्ये कमालीची कामगिरी बजावत आहे. महिला हॉकी संघने आता उपांत्यफेरीत प्रवेश केला आहे. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियन संघाला १-० च्या फरकाने पराभूत करुन उपांत्यफेरीत प्रवेश केलाय. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्याआधीच आर्यलड आणि दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करण्याची किमया साधली होती. ४१ वर्षांच्या इतिहासात प्रथमच भारतीय महिला संघाने ऑलिम्पिकमध्ये इतकी चमकदार कामगिरी केलीय. तीन वेळा विश्वविजेता ठरलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला पराभूत करण्याचा भीमपराक्रम भारतीय महिलांना करुन दाखवत मोठ्या थाटात उपांत्यफेरीत प्रवेश केला आहे.

भारताने १-० ची आघाडी मिळवली

भारतीय महिला हॉकी संघाने कमालीची कामगिरी केली. पहिल्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही. दुसऱ्या क्वार्टरमध्ये मात्र भारतीय महिला संघाने आपलं खातं उघडलं. जागतिक क्रमवारीमध्ये दुसऱ्या स्थानी असणाऱ्या ऑस्ट्रेलियन महिला संघाची बचाव फळी भेदत भारताच्या गुरजीत कौरने पेनल्टी शॉर्टवर गोल केला. या गोलसहीत पहिल्या हाफमध्ये भारताने १-० ची आघाडी मिळवली. भारताने ही आघाडी कायम ठेवत उपांत्यफेरीतील प्रवेश निश्चित केला आहे.

पी.व्ही. सिंधूला कांस्यपदक

भारताची बॅडमिंटन क्वीन पी.व्ही.सिंधू हिनं ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकाची कमाई करत नवा इतिहास रचला. सलग दोन वैयक्तिक ऑलिम्पिक पदकं जिंकणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. सिंधूनं याआधी रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदकाची कमाई केली होती. आज टोकियो ऑलिम्पिकमध्ये सिंधूनं चीनच्या बिंग जिओवर २१-१३, २१-१५ अशा सरळ सेटमध्ये पराभव करत कांस्य पदकावर आपलं नाव कोरलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वा रे केजरीवाल…केजरीवाल सरकारची कन्हैया कुमारवर देशद्रोहाचा खटला चालवण्यास मंजुरी ..

Arati More

नन बलात्कार प्रकरणातील मुख्य साक्षीदार कत्तूथारा यांचा संशयास्पद मृत्यू

Gauri Tilekar

महाराष्ट्राच्या सत्तांतरावर 21 ते 23 तारखेपर्यंत घटनापीठासमोर सुनावणीची शक्यता

Aprna