HW Marathi
महाराष्ट्र

दत्ता पडसलगीकर यांच्या सेवा मुदतवाढीविरोधात रिट याचिका दाखल

मुंबई | राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांना दुसऱ्यांदा तीन महिन्यांची सेवा मुदतवाढ देण्यात आली आहे. ही सेवा मुदतवाढ भेदभाव आणि सेवाविषयक नियमांचे उल्लंघन करणारी आहे असा दावा करत वकील आर. आर. त्रिपाठी यांनी रिट याचिका दाखल केली करत या मुदतवाढीला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. ही मुदतवाढ रद्द करण्यात यावी अशी विनंती या याचिकेत करण्यात आली आहे.

मुदतवाढीचा निर्णय घेणाऱ्या अधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग केल्याचा आरोप करत असून निवृत्त न्यायमूर्तींकडून याच्या चौकशीचे आदेश देण्यात यावेत अशी मागणी देखील करण्यात आली आहे.
सरकारने दत्ता पडसलगीकर यांना ३१ ऑगस्टला निवृत्त होत असताना ३ महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली. आता ही मुदत ३० नोव्हेंबरला संपणार असताना पुन्हा आणखी ३ महिन्यांच्या मुदतवाढीचे आदेश देऊन सरकारने सेवाविषयक नियमांचे उल्लंघन केले आहे, असे या याचिकेत म्हटले आहे. दरम्यान, या याचिकेवर लवकरच सुनावणी होईल, अशी माहिती मिळत आहे.

Related posts

वंचित बहुजन आघाडीची दुसरी यादी जाहीर

News Desk

खड्ड्यांविरोधात ते झाले अर्धनग्न!

News Desk

पेट्रोल पंप तपासणी मोहीम सुरु

News Desk