HW News Marathi
महाराष्ट्र

ज्येष्ठ नाटककार जयंत पवारांचं निधन!

मुंबई। प्रसिद्ध नाटककार आणि लेखक जयंत पवार यांचं आज(२९ ऑगस्ट) निधन झालं आहे. पवार यांना रात्री अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. जयंत पवार यांच्या निधनाने नाट्य क्षेत्रासह सर्वच क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

‘फिनिक्सच्या राखेतून उठला मोर’ या कथासंग्रहासाठी जयंत पवार यांना 2012 मध्ये साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने घेतलेल्या नाट्यलेखन स्पर्धेत ‘काय डेंजर वारा सुटलाय’ या नाटकासाठी जयंत पवार यांना सर्वोत्कृष्ट लेखनाचे प्रथम पारितोषिक मिळाले होते.

जयंत पवारांची कारकीर्द

अधांतर हे नाटक खूप गाजले होते. 2014 साली जानेवारी महिन्यात महाड येथे झालेल्या 15व्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या साहित्य संमेलनाचे जयंत पवार हे अध्यक्ष होते.

-अंधातर

-काय डेंजर वारा सुटलाय

-टेंगशेच्या स्वप्नात ट्रेन

-दरवेशी

-पाऊलखुणा

-फिनिक्सच्या राखेतून उठला मोर

-बहुजन संस्कृतिवाद आणि लेखक

-माझे घर

-वंश

-शेवटच्या बीभस्ताचे गाणे

-होड्या

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…शपथ देऊनही कार्यकर्ते थांबतील का ?, मुख्यमंत्र्यांचा राष्ट्रवादीला टोला

News Desk

“तुम्ही तिघे असाल तर नक्की चर्चा करु”, संभाजीराजेंचं अजित पवारांना प्रत्युत्तर

News Desk

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंचे जावई गिरीश चौधरी यांना ईडीकडून अटक

News Desk