HW News Marathi
महाराष्ट्र

एकही बालक पोषण आहारापासून वंचित राहणार नाही

मुंबई | अंगणवाडी सेविकांच्यामार्फत वितरीत केला जाणारा घरपोच पोषण आहार (टीएचआर) येत्या आठवडाभरात सर्व बालकापर्यंत पोहोचविला जाईल. एकही बालक, गर्भवती माता, स्तनदा माता पोषण आहारापासून वंचित राहणार नाही, असे महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी सांगितले.

ॲड. ठाकूर यांनी काल व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पोषण आहार पुरवठा, अंगणवाडी सेविकांचे मानधन, बाल संस्थांसाठीचे अनुदान वितरण आदींबाबत आढावा घेतला. यावेळी सचिव श्रीमती आय. ए. कुंदन, महिला व बालविकास आयुक्त डॉ.ऋषिकेश यशोद, एकात्मिक बालविकास योजना आयुक्त श्रीमती इंद्रा मालो व्हिडिओ कॉन्फरन्सवर उपस्थित होत्या. घरपोच पोषण आहार वेळेत पोहोचण्यासाठी ॲड. ठाकूर यांनी संबंधितांना निर्देश दिले.

कोरोना प्रसाराच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊननंतर पोषण आहार पुरवठ्यामध्ये काही अंशी अडचणी उद्भवल्या होत्या. भारतीय अन्नधान्य महामंडळामार्फत पोषण आहारांअंतर्गतचे धान्य उपलब्ध झाले होते. तथापि, लॉकडाऊनमुळे हे धान्य वाहनात भरण्यासाठी कामगार उपलब्ध नसल्याने तसेच धान्याच्या वाहतुकीमध्ये अडथळा निर्माण झाला होता.

ॲड. ठाकूर यांनी सर्व संबंधित यंत्रणांशी संपर्क साधून पोषण आहाराच्या धान्याची उचल तसेच वाहतूक त्वरीत होईल या अनुषंगाने निर्देश दिले. त्यानुसार धान्य उपलब्ध होण्याची कार्यवाही सुरू झाली असून सर्व जिल्ह्यात हे धान्य पोहोचले आहे. एप्रिल तसेच मे 2020 साठी गर्भवती माता, स्तनदा माता तसेच 6 महिने ते 3 वर्षे वयोगटातील बालकांसाठीचा घरपोच पोषण आहार (टेक होम रेशन-टीएचआर) नियमित पद्धतीनुसार वितरीत करण्यात आला आहे.

3 ते 6 वयोगटातील बालकांना अंगणवाडीमध्ये गरम ताजा आहार (हॉट कुक्ड मील- एचसीएम) दिला जातो. परंतु, कोरोना प्रसाराच्या पार्श्वभूमीवर बालकांना अंगणवाडीमध्ये न बोलावता त्यांच्या घरीच एचसीएमऐवजी घरपोच पोषण आहार (टीएचआर) देण्याचा निर्णय घेतला आहे. या वयोगटातील बालकांसाठीचे घरपोच पोषण आहाराचे नियतन जिल्हास्तरावर वितरणाची कार्यवाही सुरू असून दि.20 एप्रिल 2020 पूर्वी सर्व राज्यभरात वितरीत केला जाईल याची खात्री करावी, असे निर्देशही महिला व बालविकास मंत्री यांनी यावेळी दिले.

अंगणवाडी पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, मदतनीस खूप चांगल्या पद्धतीने काम करत असून घरोघरी जाऊन कोरोना बाबत जनजागृतीचे काम केले जात आहे. महिला व बालविकास विभाग त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे त्यांनी आश्वस्त केले. अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचे मानधन तसेच बाल संस्थांसाठीच्या अनुदान वितरणाबाबतही शासनस्तरावर सकारात्मक कार्यवाही सुरू असल्याचे मंत्री ॲड. ठाकूर यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“देवेंद्र फडणवीस माझे मित्र आहेत पण…!”

News Desk

आता मध्य आणि पश्चिम रेल्वेने थकवले पाण्याचे २३३ कोटींच बिल

News Desk

स्वातंत्र्य सैनिकांच्या निवृत्तीवेतनात दुप्पटीने वाढ, दरमहा मिळणार २० हजार रुपये

Aprna